Home विदर्भ हिंगोलीच्या कन्यका परमेश्वरी उद्यानात वृक्षारोपण

हिंगोलीच्या कन्यका परमेश्वरी उद्यानात वृक्षारोपण

103

आशाताई बच्छाव

1001767085.jpg

हिंगोलीच्या कन्यका परमेश्वरी उद्यानात वृक्षारोपण हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील.दि. 30 जुलै रोजी हिंगोली येथील एन.टी.सी.परिसरातील नियोजित कुलस्वामिनी वासवी कन्यका परमेश्वरी उद्यान येथे व विविध ठिकाणी ६३ झाडांचं वृक्षारोपण करण्यात आले.माजी वनमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आर्य वैश्य महासभा हिंगोली ,वनराई हिंगोली जिल्हा,बालाजी मित्र मंडळ ,व समस्त आर्य वैश्य समाजाची मंडळी ह्यात सहभागी झाली होती.ह्या प्रसंगी वृक्षारोपण संगोपन विशेषतः पर्यावरण संतुलन क्षेत्रात पिढ्या न पिढ्या कार्य केलं तरच पुढील पिढ्यांना जगता येईल अन्यथा संभाव्य आपत्तीनं तोंड द्यावे लागेल अस महासभा आणि वनराई परिवाराचे पदाधिकारी पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी सांगितले.पर्यावरण असंतुलन बाबीचे गांभीर्य ओळखून आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार ह्यांनी पर्यावरण क्षेत्रात विविध कामगिरी बजावून गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड आशिया बुक आदी ठिकाणी आपल,आपल्या राज्याचा,नाव विश्वस्तरावर लौकिक केलं ही राज्यासह समस्त आर्यवैश्य समाजासाठी भूषणावह बाब आहे अस म्हंटल.पद्मविभूषण डॉ.मोहन धारिया च्या वनराई ने देखील आ.मुनगंटीवार ह्यांच्या ऐतिहासिक कामगिरी च मोठ कौतुक केलं होत असेही त्यांनी सांगितलं.ह्याप्रसंगी आर्य वैश्य समाज कुलस्वामिनी वासवी कन्यका परमेश्वरी च्या नावाचा जयघोष करून आ.सुधीर मुनगंटीवार ह्यांना मंत्रिपदी विराजमान करण्यात यावे अशी सामूहिक मागणी करण्यात आली.हिंगोली येथील तापडिया इस्टेट,एन.टी.सी. परिसरातील नियोजित वासवी कन्या परमेश्वरी ह्या आर्यवैश्य समाजा च्या कुलस्वामिनी च्या नावाने उद्यान विकसित करण्यात येणार आहे त्यासाठी नगर परिषदेने ठराव घेतला असून आमदार तानाजीराव मुटकुळे ह्यांनी सभागृहासाठी आवश्यक निधी देण्याचे समाजाच्या बैठकीत जाहीर केले असल्याने समस्त आर्य वैश्य समाज मधे आनंदाचे वातावरण आहे.सदरील उद्यानात वृक्षारोपण करून शिवपार्वती पोल्ट्री फीड्स एम.आय.डी.सी.हिंगोली, डूब्बेवार असोसिएट्स एन. टी.सी. परिसर, मामडे निवास नाईक नगर,अशोक बासटवार ह्यांच्या फॉर्म आदी ठिकाणी माजी वनमंत्री आ.मुनगंटीवार ह्यांच्या ६३ व्या.वाढदिवसा निमित्त एकूण ६३ झाड लावण्यात येऊन संबंधितांना संगोपनाची जबाबदारी देण्यात.वृक्षारोपण उपक्रम मोहिमेच्या आजच्या मुहूर्तमेढ प्रसंगी ६३ झाडांचं रोपण करण्यात आले असले तरी वृक्षारोपण, रुफटॉप वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली,सौर ऊर्जा स्तोत्राचा वापर आदी पर्यावरण संतुलन क्षेत्रातील कार्य निरंतर सुरू ठेवण्याचा आर्य वैश्य समाज मंडळींचा निर्धार असल्याचं आर्य वैश्य महासभेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष गिरीशदादा गुंडेवार ह्यांनी सांगितलं.ह्या उपक्रमात सहभागी सर्वांचे तसेच वनराई हिंगोली जिल्हा,बालाजी मित्र मंडळ हिंगोली,समस्त आर्य वैश्य समाज आदींचे आभार आर्य वैश्य महासभा हिंगोली जिल्हा सचिव आनंद निलावार ह्यांनी मानले.ह्या सर्व संस्था पदाधिकारी सदस्य व हितचिंतक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.”एक पेड माँ के नाम” मोहिमेत ही सहभाग घेतल्याचे अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी ह्या प्रसंगी सांगून ही चळवळ गतिमान करण्याचा संकल्प केला .

Previous articleवसमत नप निवडणुकीच्या मोर्चा बांधणीला विद्यमान आमदार यांच्याकडून सुरुवात
Next articleसत्यभामा’ ८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.