आशाताई बच्छाव
बबलू टेकाळे यांच्या वतीने सर्पमित्र प्रवीण फुगारे यांना आवश्यक साहित्य भेट.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
सापांचे जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस तत्पर राहणाऱ्या सर्पमित्रांचे कार्य समाजासाठी खऱ्या अर्थाने जीवनरक्षक ठरते. सापांविषयी भीती आणि चुकीच्या समजुतींमुळे अनेक वेळा लोक त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र सर्पमित्र अशा प्रसंगी जीव धोक्यात घालून सर्पांना सुरक्षित ठिकाणी सोडवतात.
अशाच धाडसी आणि निस्वार्थ कार्याचा सन्मान करत खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे यांनी नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्र प्रवीण फुगारे यांना सर्पवाचक कार्यासाठी उपयुक्त साहित्य भेट दिले.
या वेळी टेकाळे म्हणाले, प्रवीण फुगारे यांचे कार्य म्हणजे खरे सामाजिक धाडस आहे. सर्पांचे प्राण वाचवणे म्हणजे निसर्गातील संतुलन टिकवणे होय. हे कार्य केवळ धाडसच नाही तर जबाबदारी आणि संवेदनशीलतेचेही प्रतीक आहे.
या मदतीबद्दल सर्पमित्र प्रवीण फुगारे यांनी बबलू टेकाळे यांचे आभार मानले आणि “या प्रेरणेतून मी आणखी जोमाने व धाडसाने कार्य करणार अशी ग्वाही दिली…