Home पुणे हिंजवडी एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 23 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने...

हिंजवडी एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 23 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

246

आशाताई बच्छाव

1001764984.jpg

हिंजवडी एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 23 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे निवासी संपादक उमेश पाटील
पुण्यातील हिंजवडी परिसरातून अनेक धक्कादायक घटना सतत समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून या प्रसिद्ध आयटी हबमधून आत्महत्यांचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. अशातच आणखी एक गंभीर घटना हिंजवडी फेज-1 मध्ये घडली आहे. येथे एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 23 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. या तरुणाचे नाव पीयूष कवडे असून, तो ॲटलास कॉपको या कंपनीत नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे. पीयूषने ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. सोमवारी दि. 28 जुलै रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. यात “माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका”, असं त्याने म्हटले आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी पीयुषने टोकाचं पाऊल उचलल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
सातव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं
गेल्या वर्षभरापासून ॲटलास कॉपको कंपनीत सॉफ्टेवेअर इंजिनियर म्हणून पीयूष कवडे हा नोकरी करत होता. त्याचा पगार देखील चांगला होता. मात्र, त्याने आत्महत्या का केली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. छातीत दुखत असल्याचे सांगून तो मिटींगमधून सोडून बाहेर पडला होता आणि त्यानंतर त्याने थेट सातव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं.
प्रेमप्रकरणातून आत्महत्या?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. पीयुषचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आल्यानंतर पोलिसांनी याबाबत कसून चौकशी केली आहे. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाली का? यावर देखील पोलीस तपास करत आहेत. आत्महत्येचे कारण समोर आलं नसलं तरी वैयक्तिक कारणांतून पीयूषने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Previous articleकै. प्रमेश्वर बाबुराव पवार यांचे अपघाती निधन
Next articleकेंद्रीय प्राथमिक शाळा होट्टलमध्ये पुष्पाताई संभाजीराव होनमाने यांचा सेवापूर्ती गौरव सन्मान सोहळा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.