Home अमरावती धामोरी गावातील नागरिकांनी 150 ते 200 वर्षांपूर्वीची परंपरा ठेवली अबाधित दीड दिवसाच्या...

धामोरी गावातील नागरिकांनी 150 ते 200 वर्षांपूर्वीची परंपरा ठेवली अबाधित दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे आगमन व विसर्जन.

125

आशाताई बच्छाव

1001764878.jpg

धामोरी गावातील नागरिकांनी 150 ते 200 वर्षांपूर्वीची परंपरा ठेवली अबाधित
दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे आगमन व विसर्जन. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख .
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती -( धामोरी )
नागपंचमीला सर्वत्र नागाची पूजा केली जाते मात्र अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील धामोरी कसबा या गावात नागपंचमीच्या आदल्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन केले जाते . मागील 150 ते 200 वर्षांपूर्वीची ही परंपरा या परंपराचे वैशिष्ट्य काय चला तर मग जाणून घेऊया आपल्या विशेष रिपोर्ट मधून
अवघ्या महाराष्ट्र राज्याचे दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन होण्याकरिता आणखी काही दिवस शिल्लक आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील धामोरी कसबा या गावात मागील १५० ते २०० वर्षापासून गणपती बाप्पा नागपंचमीच्या आदल्या दिवशी विराजमान होतात व नागपंचमीच्या दिवशी या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. विसर्जनादरम्यान धामोरी या गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली जाते
विशेष म्हणजे हा गणपती मानाला पावणारा गणपती आहे ज्या बैल गाडी मध्ये गणपतीला विसरण्यासाठी नेले जाते त्या गाडीला बैल लावले जात नाही तर गावातील तरुण मंडळी त्या बाप्पाच्या गाडीला ओढत ओढत विसर्जन स्थळी नेले जाते.या दिव्य भव्य मिरवणुकीत पंचक्रोशीतील अनेक दिंड्या सहभागी होतात. बाप्पाच्या मिरवणुकी दरम्यान गावातील प्रत्येक घरासमोर आकर्षित अशी रांगोळी काढली जाते.
या भव्य दिव्य मिरवणुकीला गावातील सर्व धर्माचे नागरिक एकत्र येऊन बाप्पाचे विसर्जन करतात.
गणपती बाप्पाची स्थापना गावातील हनुमान मंदिर( मळी) या ठिकाणी सार्वत्रिकरीत्या केली जाते या प्रथेची सुरुवात 150 ते 200 वर्षांपूर्वी एका गुरुजींनी केली होती असे गावातील नागरिकाकडून सांगण्यात येते.