आशाताई बच्छाव
टी व्ही स्टार डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर
हा सन्मान श्री संत भगवान बाबांचा आशिर्वाद असल्याची भावना
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
विश्वशांती केंद्र आळंदीचे समन्वयक; ११ हजाराहून अधिक किर्तन सेवा
मानवतेचा वसा आणि वारसा चालवत समता , बंधुत्व , ऐक्य आणि सर्वधर्म भावाची मूल्य आयुष्भर जपत आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करत संत सज्जनांचा विचार कार्याला वाहून नेणारे लोकप्रिय समाज प्रबोधनकार आणि किर्तनकार डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर यांना सकल वंजारी समाजाच्या वतीने समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार श्री.संत भगवान बाबांचा आशिर्वाद असल्याच्या विनम्र भावना डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर यांनी व्यक्त केल्या. २७ जुलै रोजी संपूर्ण वंजारी समाज महाराष्ट्र राज्य यांचेकडून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर अध्यक्ष संतश्री भगवान बाबा सेवा आश्रम श्री क्षेत्र ढगी, समन्वयक विश्वशांती केंद्र आळंदी पुणे यांना समाजरत्न पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रातील श्रेष्ठ मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत आहे.
श्री संत भगवान बाबांचे चरित देशभर प्रसारित
गडावर मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी व गोपीनाथ मुंडे साहेब यांचे हस्ते कॅसेटचे शानदार प्रकाशन झाले. कॅसेट निमित्ताने संतश्री भगवान बाबा यांचे चरित्र महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक मध्ये घरा घरात संतश्री भगवान बाबा यांच्या कार्याचा प्रचार – प्रसार केला. त्याकाळी लाखोंच्या संख्येने ही कॅसेट सर्वत्र वाजत होती. संतश्री भगवान बाबा यांचे कॅसेट आणि दसरा मेळावा निमित्त मुंढे साहेबाना अतिशय जवळून पाहण्याचा योग आला.
डॉ. विश्वनाथ कराड यांच्याकडून मोठी जबाबदारी
पुढे समाजातील अतिशय उच्च शिक्षण महर्षी विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड विश्व शांती केंद्र आळंदी माईटस एम. आय. टी. पुणे यांचा परिचय व भेटीचा योग आला.सर्व कलागुण संपन्न सुदाम महाराज यांचे सर्व गुण पाहून श्री क्षेत्र आळंदी , देहू परिसर विकास समिती व विश्व शांती केंद्र ही मोठी जबाबदारी गेली २५ वर्ष पूर्णपणे सांभाळत आहेत.
११ हजाराहून अधिक प्रवचन, किर्तन, प्रबोधन सेवा
याच काळात ढगी बोरगावला संतश्री भगवान बाबा सेवा आश्रम स्थापन करून या भागात पहिले संतश्री भगवान बाबा यांचे भव्य दिव्य मंदिर उभे केले. देशभर कथा , किर्तन , प्रवचने या माध्यमातून देव व देशभक्ती , शिक्षणाचा प्रसार केला. किमान ११ हजारापेक्षा जास्त किर्तन केली आहेत. दुर्दैव श्री. गोपीनाथ मुंढे साहेब आपल्याला सोडून गेले. डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर यांनी दैवत मुंढे साहेब यांचा महाराष्ट्रातील अतिशय सुंदर पुतळा तयार केला आहे. ना.पंकजाताई मुंढे यांच्या शुभहस्ते पुतळ्याचे अनावरण केले. अतिशय सुंदर सोहळा केला. किमान ५० हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. मुंढे साहेब परत या ही साहेब आणि भगवान बाबांची गाणी त्यांनी स्वतः तयार करून प्रसिद्ध केली. प्रसिद्ध संगीतकार श्री.अशोक वायंगणकर यांच्या संगीतामध्ये गाणी गाऊन प्रसिद्ध केली. ती लोकप्रिय गाणी दररोज लाखो लोक ऐकतात.
संत तुकोबांची हृदयस्पंदने लोकप्रिय कथा
श्री क्षेत्र आळंदी ,देहू येथे कराड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कार्य केले त्यामुळे इंद्रायणी तीरावर श्री ज्ञानोबा माऊली समाधी सोहळा किर्तन सेवा मिळाली. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे संतश्री तुकोबांची हृदय स्पंदने ही कथा अतिशय लोकप्रिय झाली.सतत रात्रंदिवस समाज सेवा करत असताना आपला प्रपंचही सुखाचा केला. एक मुलगा उच्च शिक्षित गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तर दुसरे चिरंजीव महाराष्ट्र पोलिस खात्यात डी. वाय. एस. पी. असून मुलगी इंजिनियर आहे. हरिभजने ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा या अभंगाप्रमाणे अतिशय सुंदर आवाज , उच्च शिक्षण .. निर्मळ चरित्र आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत.
टी.व्ही.चॅनेलवरील लोकप्रिय किर्तनकार
१९९९ ला मराठवाड्यातून सह्यादी टिव्हीवर पाहिले किर्तन केले. कलर्स मराठी , स्टार प्रवाह ,झी टॉकीजवर दररोज अनेक किर्तन सुरू असतात. संतश्री भगवान बाबा पहिली कॅसेट.मुंढे साहेबांचा पहिला पुतळा .. भगवानबाबा व मुंढे साहेब यांची पहिल्यांदा भावगीते काढली, देहू ,आळंदी, पंढरपूर येथे उल्लेखनीय सेवा , मुलांचे उच्च शिक्षण, अतिशय गोड आवाज , सांगण्याची उत्तम शैली , आदी विविध सदगुणांनी सकल वंजारी समाजाने समाज रत्न हा मानाचा पुरस्कार देऊन योग्य तो यथोचित निर्णय घेतला व त्यांचा गौरव केला आहे. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.