आशाताई बच्छाव
देवळा तालुक्यात अवैध धंद्याचे “सार्थक”झाले,कनवर (संजय)- बापूंने सट्टा किंग होण्याचे स्वप्न पूर्ण केले!!
गुंजाळवाडीतील प्रकार….
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव: नाशिकच्या देवळा तालुक्यातील गुंजाळवाडी या गावी वडाळीभोई भागातील कनवर (संजय),बापूने सट्टा किंग होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केले.
देवळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष व धाडसी पोलिस निरिक्षक सार्थक नेहते यांनी अनेक अवैध धंदे उध्वस्त करून व गुंतागुंतीचे गुन्हे उघड करून एक मोठा दबदबा निर्माण केला आहे.
असे असले तरी मात्र देवळा तालुक्यातील गुंजाळवाडीत वडाळीभोई भागातील कनवर (संजय) व बापूने सट्टा मटका जुगाराच्या नावाखाली या भागात थैमान घातले असून, त्यामुळे या भागातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक जुगाराच्या नादी लागून आपल्या सुखी संसाराची होळी करून घेताना दिसत आहेत.तर या गुंजाळवाडी परिसरात सुरू असलेल्या कनवर बापूंच्या सट्टा मटका जुगार अड्डयामुळे कमी श्रमात जास्त पैसे मिळत असल्याच्या लालसेपोटी जुगार खेळणारे गोरगरीब सर्वसामान्य गुरफटत चालल्याने शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मोलमजूर मिळणेही अवघड होऊन बसले आहे.या बेकायदेशीर अवैध जुगार अड्डयाकडे देवळा पोलिसांचे “अर्थपूर्ण”दुर्लक्ष झाल्याने सट्टा माफीया कनवर -बापूचे मात्र स्वप्न “सार्थक”झाले आहे.
वासोळच्या कोलती नदीकाठी,जुगारीची गर्दीच मोठी!
तसाच अवैध जुगार धंद्याचा दुसरा प्रकार देवळा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वासोळ गावाजवळील कोलती नदीकाठी सुरू असल्याने जुगार खेळणाऱ्या जुगारीची येथे नेहमीच मोठी गर्दी असते.त्याची माहिती पोलिसांना असूच नये,याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तर या अवैध धंद्याचा समूळ बिमोड नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनीच करावा अशीच अपेक्षा आता या भागातील नागरिक करीत आहेत.