आशाताई बच्छाव
सात जणांच्या पार्टीला रेव्ह म्हणतात का? एकनाथ खडसेंचा सवाल
पुणे :निवासी संपादक उमेश पाटील
पुण्यात 26 जुलैच्या रात्री छापेमारीत एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. खराडी भागात हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती असा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, आज पत्रकार परिषेद घेत खडसे यांनी पुणे पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे?
पोलिसांच्या कारभाराविषयी माझ्या मनात काही शंका आहेत. तिथे पाच सात जणांची पार्टी चालू होती. तिथे कोणतेही संगीन नाही. नृत्य नाही. कोणताही गोंधळ नाही. एका घरात पाच- सात जण पार्टीत होते. त्याला तुम्ही रेव्ह पार्टी कसे म्हणता? राज्यात कुठेही पाच- सात जण मिळून पार्टी करत असतील तर त्याला रेव्ह पार्टी म्हणणार का? रेव्हा पार्टीची नेमकी व्याख्या काय ती पोलिसांनी स्पष्ट करावी. त्यामुळे रेव्ह पार्टी आयोजित केली म्हणून माझ्या जावयाची बदनामी करण्याचे प्रयोजन काय? असे सवाल खडसेंनी यावेळी उपस्थित केले.
तसेच, माझ्यावर साध्या वेशातील पोलिस पाळत ठेऊन असल्याचेही खडसेंनी यावेळी दावा केला आहे. माझी पत्रकार परिषद सुरु असताना साध्या वेषातील पोलीस आले. माझ्या घराच्या बाहेर आत्ताही पोलीस आहेत. माझ्या छातीवर बसण्याचा प्रयत्न करतायेत. माझा सरकारला सवाल आहे की, माझ्यावर पाळत का ठेवली जात आहे? माझा आरोप आहे की रेव्ह पार्टी हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे.