Home भंडारा रंग श्रावणाचा… भारत गौरव सन्मान सोहळा पुणे 2025 उत्साहात संपन्न.

रंग श्रावणाचा… भारत गौरव सन्मान सोहळा पुणे 2025 उत्साहात संपन्न.

109

आशाताई बच्छाव

1001758954.jpg

रंग श्रावणाचा… भारत गौरव सन्मान सोहळा पुणे 2025 उत्साहात संपन्न….

पुणे येथील पत्रकार भवन येथे रंग श्रावणाचा भारत गौरव सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न

भंडारा ( तुमसर) येथील शाहीर गणेश मेश्राम सन्मानित

 

संजीव भांबोरे
भंडारा -हिरकणी विकास महिला संस्था शांताई फाउंडेशन व विसावा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा घेण्यात आला.
हिरकणी विकास महिला संस्थेच्या अध्यक्षा शर्मिलाताई नलावडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक विविध क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय व कामगिरीबद्दल अनेक क्षेत्रात पारंगत असलेले मान्यवर दिग्गज यांचा शोध घेऊन त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये भारत गौरव सन्मान पुरस्कार हिरकणी पुरस्कार समाज गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्काराचे स्वरूप होते.
हिरकणी विकास महिला संस्था ही महाराष्ट्रातील अग्रेसर संस्था आहे या संस्थेच्या संचालिका शर्मिलाताई नलावडे याही अनेक पुरस्कार प्राप्त महिला आहेत. यांनाही अनेक संस्थांनी उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
यांचेही महिलांसाठी फार मोठे योगदान आहे त्यांनी महिलांचे अनेक बचत गट तयार करून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला तसेच त्यांनी वृद्धाश्रम चालवून अनेक चांगले जीवनदान दिले आहे.
हिरकणी विकास महिला संस्थेच्या संस्थापिका शर्मिलाताई नलावडे यांनी राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व महिलांचा आणि संस्थांचा वीलोभनीय राष्ट्र गौरव सन्मान या ठिकाणी केला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय श्री तेजस बर्वे ( संत ज्ञानेश्वरांचे मुक्ताई चित्रपटातील मुख्य भूमिका), माननीय
प्रकाश दिंडले (अभिनेते दिग्दर्शक नटीने मारली मिठी गाणे), दिलीप घेवंदे (अभिनेते गोष्ट प्रेमाची (मालिका स्टार प्रवाह) माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात संचालक समृद्धी प्रकाशन)
त्याचप्रमाणे शांताई फाउंडेशन विसावा फाउंडेशन आणि हिरकणी विकास महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले . सदर कार्यक्रमात सदर कार्यक्रमात शाहीर गणेश परसराम मेश्राम भंडारा (तुमसर )यांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय नियोजनबद्ध डॉक्टर बी एन खरात सर यांनी केले डॉ बी एन खरात यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले.