आशाताई बच्छाव
क्रांतीदिनी “लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटना” राज्य कार्यकारिणी जाहीर होणार!
मालेगाव प्रतिनिधी प्रविण क्षीरसागर:-
लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारिणी नऊ आँगस्ट क्रांतीदिनी जाहिर करण्यात येऊन संघटनेची अधिकृतपणे या दिवशी स्थापना केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यस्तरीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन पुरुष व दोन महिलांना स्थान देण्यात येणार असून, आगामी काळात जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय व शहरी कार्यकारिणी गठित केल्या जाणार आहेत.तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेडोपाडी संघटनेच्या शाखा स्थापन करण्यात येऊन, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधात क्रांतीकारी स्वरुपात लढा उभारला जाणार आहे.शिवाय पत्रकार व पोलीस बांधवांच्या हक्क व न्यायासाठी संघटनेचे नियोजन ठरविण्यात आले आहे.
संघटनेत सहभागी होण्यासाठी पुरुष व महिलांनी ,युवक व युवतींनी, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी, शिवाय शेतमजूर व शेतक-यांनी आपला फोटो, आधारकार्ड आँनलाईन व्हाँटसअप क्रमांक ९८५०४४७६८५ या मोबाईल नंबरवर पाठवून सहभाग शुल्क १५००/- रुपये फोन पे नंबर ९९२३३६२०३० वर पाठविल्यास संघटनेत सहभागी होणाऱ्या सभासदांना ओळखपत्र सोबतच पंधरा लाख रुपयांचा अपघाती विमा एक वर्षासाठी दिला जाणार असल्याचे शेवटी पत्रकातून नमूद केले आहे.