आशाताई बच्छाव
कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र साठी लोकसहभाग घ्यावा -हिगोली
-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता. हिंगोली.श्रीहारी अंभोरे पाटील हिंगोली जिल्ह्यातील कुष्ठरोग संदर्भात हिंगोली जिल्हा आधीकारी राहुल गुप्ता यांनी आज कुठल्याही राष्ट्रीय कार्यक्रमाच्या यशस्वितते साठी लोकसहभाग महत्वाचा असून वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनी सामूहिक सहभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे ते आज हिंगोली येथे कुष्ठरोग निर्मूलनार्थ आयोजित निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण कार्यक्रमात दिसून आले त्याबद्दल मी आयोजकांचे अभीनंदन करतो व प्रशासन तर्फे आवश्यक रीतसर सहकार्य करण्याची ग्वाही देतो असे उदगार हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता ह्यांनी काढले.हिंगोली जिल्हा त्वचारोग संघटना,सहाय्यक संचालक कुष्ठरोग हिंगोली कार्यालय,व हिंद कुष्ठ निवारण संघ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने “क्लिनिकल अँड सोशल अस्पेक्ट्स ऑफ लेप्रसी” ह्या विषयाच्या अनुषंगाने आयोजित एक दिवसीय कार्यशाळा चे उद्घाटपर भाषणात जिल्हाधिकारी बोलत होते.भगवान धन्वंतरी पूजन आणि दीप प्रज्वलन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि उपस्थित गणमान्यांचे हस्ते करण्यात आले.ह्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, हिंद कुष्ठ निवारण संघाचे राज्याध्यक्ष डॉ.पी डी.जोशी पाटोदेकर,प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ.व्ही.व्हि.पै ,व उदय ठकार,डॉ.पंकज राठी,आय एम ये हिंगोली चे सचिव डॉ.राम मुंढे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दीपक मोरे,सहाय्यक संचालक डॉ राहुल गीते,व क्षयरोग निर्मूलन प्रमुख डॉ.देवेंद्र जायभाय,आदी उपस्थित होते.ह्यांचं स्वागत त्वचा रोग संघटना चे विभागीय अध्यक्ष डॉ.शिवाजी गित्ते,हिंगोली जिल्हा सचिव महारुद्र भोसले,डॉ.राम काबरा,डॉ.नंदकिशोर करवा,डॉ.गजानन चव्हाण,डॉ.महारुद्र भोसले,डॉ.करपे,डॉ.पवार,आदींनी केले.स्वागत पर प्रास्ताविकात विभागीय अध्यक्ष डॉ.शिवाजी गित्ते ह्यांनी मी खासगी डॉ.असताना हिंगोली जिल्ह्यात कुष्ठरोग दुरीकरण कार्यक्रमात हिंगोली कुष्ठरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी सर्व शासकीय यंत्रणेला समर्पित भावनेने सहकार्य केले त्याबद्दल जिल्हा प्रशासन आणि शासनाने शाबासकी च्या रूपात राज्यस्तरीय समिती वर नियुक्त केल्याने प्रोत्साहित झालो त्यात सर्व सहकारी मंडळींच पाठबळ आहे अस म्हटलं.हिंद कुष्ठ निवारण संघ महाराष्ट्र शाखेने शासन प्रशासन आणि लोकसह भागाने राज्यात आणि हिंगोली जिल्ह्यातील त्वचा रोग संघटनेच्या साह्याने मिळविलेले यश कौतुकास्पद आहे असे म्हणून यशालेख सादर केला.न. प हद्दीतील कुष्ठरोगाने विकलांग रुग्णांना जीवन निर्वाह भत्ता,कुष्ठ पीडित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आदी मदत, आशा अंगणवाडी सेविका व आरोग्य सहाय्यके ह्यांना प्रशिक्षित करून सर्वेक्षण कार्यात अधिक सहभागी करावे, कुष्ठरोग पीडिता बाबत पुनर्वसन करणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने पाठबळ द्यावे असे म्हटले.हिंद कुष्ठ निवारण संघाचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. पै.ह्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे सहभागी मंडळीना मार्गदर्शन केले.उदय ठकार व डॉ.पंकज राठी ह्यांनी ह्या कार्यक्रमातून २०२७ पर्यंत राज्य कुष्ठरोग मुक्ती घडवून आणण्यासाठी करावयाची प्रक्रिया ह्याबाबत मार्गदर्शन केले.ह्याप्रसंगी शासनाच्या कुष्ठरोग निवारण समितीवर हिंगोलीचे डॉ.शिवाजी गीते,डॉ. व्हि. व्हि.पै,उदय ठकार,ह्यांचा तर कुष्ठरोग निवारणार्थ लोकसहभाग देणाऱ्या डॉ.महारुद्र भोसले,डॉ.राम काबरा,ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता ह्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.हिंगोली जिल्हा आय एम ए संघटना,त्वचारोग संघटना,सहाय्यक संचालक कुष्ठ रोग कार्यालय व क्षयरोग नियंत्रण कार्यालय हिंगोली,सामान्य रुग्णालय ,वैद्यकीय महाविद्यालय आदींच्या सर्व संबंधित डॉक्टर्स स्टाफ आणि प्रशासनाच्या सहकार्याने हे यश मिळाल्या बद्दल डॉ.शिवाजी गीते ह्यांनी आभार मानले.