आशाताई बच्छाव
शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर येथे अन्नदान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर —– येथे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर येथे अन्नदान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या बाबतीत अधिक माहिती अशी की, देगलूर येथे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाइकांना व गोरगरीब दिनदलित जनतेसाठी आज दि.27 जुलै रोजी बुंदी लाडू, खारी बुंदी, वरणभात,भाजी चपाती, आदी स्वादिष्ट अन्नदान कार्यक्रम व रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, शंतनु महाराज देगलूरकर, डॉ केन्द्रे डॉ लाडके, तिवारी,शिवसेना शहरप्रमुख संजय जोशी, शिवसेना शहरप्रमुख रवि उल्लेवार,शहर संघटक भगवान जाधव युवा सेना तालुका समन्वयक तथा शिवसेना सोशल मिडिया नेटवर्कर तालुका प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख मानाजी पाटील लोणे लोणीकर शिवसेना उपशहरप्रमुख मष्णाजी पैलावार,अल्पसंख्याक सेना युवा सेना उपशहरप्रमुख गणेश चप्पलवार युवा सेना देविदास थडके देगावकर,तालुका प्रमुख युसुफभाई मिस्त्री, अल्पसंख्याक सेना शहर प्रमुख सय्यद मिर भाई , विभाग प्रमुख राजु उल्लेवार , विभाग प्रमुख गंगाधर पाटील चाकूरकर, विभाग प्रमुख तुकाराम महाराज काठेवाडी कर, गंगाधर वंकलवार होट्टलकर, युवा सेना शहर समन्वयक संतोष कांबळे , अशोक निंबाळकर,गुत्तेलिंबा, शिवाजी सुर्यवंशी मुजळगेकर, उपविभाग प्रमुख हाणमंत राजुरे लख्खेकर, विभाग प्रमुख सुभाष खुनेवाड माळेगावकर आदी शिवसेना, युवा सेना पदाधिकारीसह शेकडो रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, गोरगरीब दिनदलित मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वादिष्ट, रुचकर भोजनाचा स्वाद घेतला