आशाताई बच्छाव
कलाश्रम आयोजित श्रेय नामावली स्पर्धा-२०२५
मुंबई : ( प्रतिनिधी विजय पवार )
स्वातंत्र्य सैनिक डॉ. परशुराम मुकुंद पाटील कला केंद्राच्या अंतर्गत ‘कलाश्रम’ ही संस्था शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यकर्ते प्रत्येक महिण्याला ‘अभिनव स्पर्धा’ आणि ‘अभियान सन्मान’ या उपक्रमाचे आयोजन करत असते. बुधवार, ३० जुलैला सायंकाळी ७ वाजता, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, चौथा मजला, चित्रकला दालन, मुंबई – ४०००२५ येथे हा उपक्रम होत असतो. यावेळी होणारा कलाश्रमचा हा ६७ वा उपक्रम आहे.
सुलेखनकार, पद्मश्री अच्युत पालव हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच जुलै महिन्यात दिवंगत झालेल्या चार व्यक्तींचे स्मरण आणि तसे कार्य करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तीचा आदर हे या उपक्रमाचे स्वरूप आहे. आपला स्नेह, आशीर्वाद सदैव आमच्या संस्थेच्या सोबत राहू द्या!
समन्वयक :- नंदा कोकाटे : ९९६७८८४४१८