Home बुलढाणा लाचखोरीचा धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनासाठी २ लाखांची मागणी, शिवसैनिकांचा कारभार ‘शिवसेना...

लाचखोरीचा धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनासाठी २ लाखांची मागणी, शिवसैनिकांचा कारभार ‘शिवसेना स्टाईल’ ने!

50

आशाताई बच्छाव

1001749712.jpg

लाचखोरीचा धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनासाठी २ लाखांची मागणी, शिवसैनिकांचा कारभार ‘शिवसेना स्टाईल’ ने!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
खामगाव (युवा मराठा) खामगाव शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटी महिला कॉलेजमध्ये संतापजनक प्रकार समोर आला आहे. निवृत्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीवेतनाच्या नावाखाली तब्बल दोन लाख रुपये उकळल्याचा आरोप कॉलेजमधील कर्मचारी जयेश चंद्रकांत नागडा याच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला ही शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख यांची आई असूनही तिला वारंवार चकरा माराव्या लागल्या. या कर्मचाऱ्याने आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपये घेतले असून, अजून २५ ते ३० हजारांची मागणी करत
असल्याची माहिती मिळाली आहे. एवढेच नव्हे तर पैशांच्या मागणीला कंटाळून संबंधित महिलेला थेट कॉलेजच्या आवारातून बाहेर काढण्यात आले, ही बाब धक्कादायक आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे व शहरप्रमुख चेतन ठोंबरे यांनी तत्काळ कॉलेज गाठले. त्यांनी नागडा याला ‘शिवसेना स्टाईल’ने चोप दिला आणि जाब विचारला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ
उडाली आहे.शिक्षण संस्थेतील अशा प्रकारच्या लाचखोरीच्या घटना म्हणजे नीतिमत्तेचा पूर्ण अधःपात आहे. निवृत्तीवेतन हा कर्मचारीचा हक्क असून त्यासाठी पैसे उकळले जाणे हा गुन्हाच आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी संतप्त मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

Previous articleपहेला येथील स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था
Next articleलोकेशनवर अवैध वाळूचा ‘खेळ चाले !’ – वाळू तस्कराला लोकेशन देणारा खबऱ्या गजाआड ! व्हाट्सअप ग्रुपवरून देत होता माहिती !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.