आशाताई बच्छाव
उमरगा प्रतिनिधी: अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे -पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सुरज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले .सविस्तर वृत्त असे की ,राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान भवना मध्ये बसून ऑनलाइन रमी खेळत होते. त्या संदर्भामध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे -पाटील हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देऊन , कृषीमंत्र्याचा लवकरात लवकर राजीनामा घेऊन घरी बसवा आणि त्यांना पत्ते दिले. घरी बसून पत्ते खेळा अशी प्रामाणिक मागणी करत असताना ,अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी घाडगे पाटील यांच्यावर अमानुषपणे मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ उपविभागीय कार्यालयाच्या समोर घोषणा देत उपविभागीय कार्यालय उमरगा येथे निवेदन देण्यात आले व बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये सुरज चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले .तात्काळ अशा मुजोर पदाधिकाऱ्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी शेतकरी आघाडीचे (उभाठा)जिल्हाध्यक्ष विजयकुमार नागणे,काॅग्रेस नेते विजय वाघमारे,तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार, युवा नेते अजिंक्य पाटील, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष(उबाठा )विजय तळभोगे, विशाल काणेकर ,आरपीआय चे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे , छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, महावीर पाटील, श्रीकर बिराजदार,ज्ञानेश्वर पाटील, सुमित घोटाळे, विष्णू भोसले ,वीरभद्र स्वामी , शैलेश नागणे, दादासाहेब गायकवाड, अमित रेड्डी ,महादेव कोळी, श्रावण कांबळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.






