Home भंडारा तोतया पत्रकार, पोलिस भरारी पथक वसूल करत होते खंडणी एक महिलेसह तिघांची...

तोतया पत्रकार, पोलिस भरारी पथक वसूल करत होते खंडणी एक महिलेसह तिघांची टोळी जेरबंद , साकोलीचे दोन आरोपी अटकेत

235

आशाताई बच्छाव

1001712862.jpg

तोतया पत्रकार, पोलिस भरारी पथक वसूल करत होते खंडणी

एक महिलेसह तिघांची टोळी जेरबंद , साकोलीचे दोन आरोपी अटकेत

चौथा साकोलीचा आरोपी सोनवाने फरार , १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

संजीव भांबोरे
भंडारा – पोलीस व पत्रकार असल्याचे भासवून नागरिकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश करत मूल पोलिसांनी तीन खंडणीखोरांना अटक केली आहे. या आरोपींनी पोलिस आणि पत्रकार असल्याची बतावणी करून नागरिकांना धमकावून पैसे उकळले होते. पोलिसांनी या आरोपींकडून एकूण १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चौथ्या आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
दिनांक ३ जुलै २०२५ रोजी फिर्यादी सुरेश लक्ष्मण गणमेनवार वय ३६, रा. चिरोली यांच्या घरी एक पांढऱ्या रंगाची अर्टीका कार क्र. एम एच ३४ सीजे ५८२४ येऊन त्यामधील चार जणांनी स्वतःला पोलीस भरारी पथक व पत्रकार चंद्रपूर येथील अधिकारी असल्याचे भासवले. विनापरवाना दारु साठा असल्याच्या कारणावरून कारवाईची धमकी देत त्यांनी फिर्यादीकडून तडजोडीअंती १०,००० रुपये खंडणी उकळली. त्यानंतर याच टोळीने मौजा डोंगरगाव येथील एजाज शेख यांच्या अंडा-आमलेट दुकानात जाऊन ग्राहक दारू पित असल्याचा बनाव करत कारवाईची धमकी दिली. या वेळीही तडजोड करत ५,००० रुपये खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणावरून दिनांक १३ जुलै २०२५ रोजी मुल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला. तपासात मुल पोलिसांनी आरोपी बादल दुर्गाप्रसाद दुबे वय ३६, संगिता बादल दुबे वय २७ दोघेही रा. रेंगेपार, ता. साकोली, जि. भंडारा, अजय विजय उईके वय ३१ रा. गजानन मंदिर रोड, शितला माता मंदिर मागे, चंद्रपूर या तिघांना अटक केली आहे. चौथा आरोपी देवेंद्र चरणदास सोनवाने वय ३० रा. निलज ता. साकोली, जि. भंडारा, ह.मु. भिवापूर वार्ड, चंद्रपूर हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी या आरोपींकडून एक पांढऱ्या रंगाची अर्टीका कार किंमत १२,५०,००० रू, दोन मोबाईल फोन किंमत ४५,००० आणि रोख रक्कम १५,००० रुपये असा १३,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सपोनि सुबोध वंजारी, पोहवा जमीर खान पठाण, पोहवा भोजराज मुंडरे, नापोअं चिमाजी देवकते, पोअं नरेश कोडापे, पोअं शंकर बोरसरे, पोअं संदीप चुधरी यांनी ही कारवाई केली.

नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन •

कोणीही पोलिस किंवा पत्रकार असल्याची बतावणी करून खंडणी मागत असल्यास अशा बनावट व्यक्तींच्या धमकीला बळी पडू नका. तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, साकोली ०७१८६ – २३६१३३ अथवा ११२ वर संपर्क साधावा असे आवाहन साकोली पोलिसांनी केले आहे.

Previous articleलम्पीने 4 गाई 2 वासरू दगावले! पशुवैद्यकीय दवाखाना बंद, डॉक्टर बेपता !
Next articleखडकपुर्णात बोटी द्वारे वाळू उपसा ! थातूरमातूर कारवाई नको, मुळावर घाव घाला! – अन्यथा 28 जुलैला आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषण !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.