Home भंडारा वंचित बहुजन आघाडी तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वंचित बहुजन आघाडी तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

145

आशाताई बच्छाव

1001712743.jpg

वंचित बहुजन आघाडी तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

संजीव भांबोरे
भंडारा -वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा साकोली तर्फे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात 8 व 9 जुलैला अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्याचे शेतातील फार मोठे पिकांचे नुकसान झाले पीक वाहून गेले व भंडारा गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोणाच्या घरात पाणी घुसले कोणाचे घर पडले मातीचे घर जमीन दोस्त झाले या सर्वात शेतकऱ्यांचे घराचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी केलेली आहे. काही लोकांनी घरकुलाचे फॉर्म भरलेले आहेत . दोन तीन वर्ष झाले अजून त्यांना घरकुल सुद्धा प्राप्त झालेले नाही .आणि आता त्या पावसात घर पडल्यामुळे राहायचे कुठे अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे. अशातला तात्काळ घरकुल मंजूर करून आर्थिक मदत द्यावी असे निवेदनात म्हटलेले आहे .निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक डी जी रंगारी ,वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका महिला अध्यक्ष शितल नागदेवे, वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष स्वर्णमाला गजभिये , वंचित बहुजन आघाडीचे साकोली शहर महासचिव उत्तमा गडपायले , साकोली शहर सचिव सरिता बडोले ,स्नेहा गजभिये, जितेंद्र मेश्राम ,धनराज गणवीर व इतरही कार्यकर्ते महिला आघाडीचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.