Home गडचिरोली दवाखान्याचे कर्मचारी की कर्मचाऱ्यांची मनमानी ? वैद्यकीय अधिक्षक बेपत्ता??

दवाखान्याचे कर्मचारी की कर्मचाऱ्यांची मनमानी ? वैद्यकीय अधिक्षक बेपत्ता??

256

आशाताई बच्छाव

1001712703.jpg

दवाखान्याचे कर्मचारी की कर्मचाऱ्यांची मनमानी ? वैद्यकीय अधिक्षक बेपत्ता??

ओपीडी चिट्टी ८ वाजता. .
आणि डॉक्टर किती वाजता.??

उपचारासाठी रुग्ण डॉक्टरची वाट पाहातात तेव्हा.. काय म्हणायचे??

गडचिरोली 🙁 विभागीय प्रतिनिधी) दि 15/7/2025:– जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या अधिनस्त असलेल्या उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे सुरू असलेल्या बेजबाबदार कारभाराची प्रचिती नुकतीच उघड झाली असून हा प्रकार संबंधित वैद्यकीय अधिक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्य कुशलता स्पष्ट करते. .
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित आणि बेजबाबदार कारभारामुळे आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांची ताटकळत वाट पहावी लागते. आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात ओपीडी चिट्टी सकाळी ८ वाजता पासून रुग्णांना दिली जाते मात्र डॉक्टर उपस्थित नसल्याने तब्बल दोन ..तीन तास तरी वाट पाहावी लागते. ओपीडी ची वेळ सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत असल्याचे स्पष्ट लिहिले आहे. परंतु डॉक्टरच वेळेत उपस्थित राहात नसल्याने रुग्णांची फारच गैरसोय होते. आणि वेळ वाया जातो. येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.
कोरेटी हे मुख्यालयी राहात नसल्याने अनेक विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश असल्याचे दिसून येत नाही. आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने जनतेला दर्जेदार आणि उत्तरदायी आरोग्य सेवा वेळेवर मिळत नाही. सफाई कामगार आपल्या दैनंदिन वेळी येऊन साफसफाई करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते . तर काही खुर्ची मोडणारे ही पहायला मिळतात. उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने तब्बल दोन तास तरी वाट पहात बसावे लागते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पराकोटीने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. या गंभीर बाबींकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुधारणा न केल्यास जनता वैद्यकीय अधिक्षक हटाव मोहीम राबविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात आजुबाजूच्या खेड्यातील आणि बाहेर जिल्ह्यातीलही विविध प्रकारच्या आजाराचे रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु डोळ्याचे आणि दातांचे डॉक्टर नेमके कधी येतात याचा थांगपत्ता लागत नाही. या उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर आणि कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने येथील आरोग्य सेवेचे धिंडवडे उडाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अनेक राजकीय पक्षाचे अग्रेसर असणारे हे नाममात्र लोकप्रतिनिधी करतात तरी काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Previous articleचाळीसगाव पोलिसांनी पकडला ७ लाखाचा गुटखा
Next articleविद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.