Home बुलढाणा अंढेरा पोलीस ठाण्याच्या नाकावर टिचून जुगार अड्डा ! गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई,...

अंढेरा पोलीस ठाण्याच्या नाकावर टिचून जुगार अड्डा ! गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई, अंढेरा पोलीस मात्र गप्प !

62

आशाताई बच्छाव

1001709359.jpg

अंढेरा पोलीस ठाण्याच्या नाकावर टिचून जुगार अड्डा ! गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई, अंढेरा पोलीस मात्र गप्प !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- सिंदखेडराजl स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 जुलै 2025 रोजी भरोसा शिवारात धाड टाकून सुरू असलेल्या वरली मटका व एक्का बादशाह या जुगार खेळांवर मोठी कारवाई करत तीन जुगार्यांना रंगेहाथ पकडले असून ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच पार पडली, पण स्थानिक पोलिसांना याची साधी कल्पनाही नव्हती! या घटनेने अंढेरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, “अंधारात कोण?” हा सवाल गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
स्थानिक पोलीस झोपी की हातमिळवण?
अंढेरा पोलीस ठाण्याच्या डोळ्यादेखत सुरू असलेला जुगार अड्डा स्थानिक गुन्हे शाखेला माहिती होता, पण अंढेरा पोलिसांना का नाही? हा सवाल आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत. पोलीस ठाण्याच्या नाकावर हे सगळं सुरू असताना त्यांना कानोकान खबर कशी नव्हती?एकीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी लपूनछपून कारवाई करतात, तर दुसरीकडे अंढेरा पोलीस मात्र गप्प आणि बिनधास्त ! गावकऱ्यांमध्ये संताप – “पोलीसच आंधळे?”
या कारवाईनंतर गावकऱ्यांत संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी पोलीस यंत्रणेशी
हातमिळवणी झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. सतत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी बुलढाणा शहरातून पथक येतं, हेच दर्शवतं की स्थानिक पोलीस निष्क्रिय होते की जाणूनबुजून दुर्लक्ष करत होते?
कारवाई करणारे पोलीस अधिकारी- HC गजानन दराडे, HC जगदेव टेकाळे, HC दिगंबर कपाटे या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप. पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले, तर पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या सूचनेवरून कारवाई करण्यात आली असून तीन आरोपी ताब्यात घेतले असून तीन आरोपी फरार आहे.

Previous articleBREAKING गुटख्याची मोठी खेप जप्त ! स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
Next articleसाक्री येथे युवा कौशल्य विकासावर भर जागतिक कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.