आशाताई बच्छाव
राज्यपाल यांच्या हस्ते फलकाचे अनावरण
साकोलीत “आई शकुंतला महाविद्यालय” चा शुभारंभ
संजीव भांबोरे
भंडारा : येथील श्याम बहुउद्देशीय शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालित आई शकुंतला महिला ( बीएससी बीकॉम ) महाविद्यालयाचे रीतसर उद्घाटन रविवार १३ जुलैला राजस्थानचे राज्यपाल मा. नामदार हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते व डॉ. हेमकृष्ण कापगते माजी आमदार साकोली विधानसभा क्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी संस्था अध्यक्ष शकुंतलाबाई कापगते, संस्था सचिव देवश्री कापगते, उपाध्यक्ष लक्ष्मीबाई नाकाडे, सदस्य शीला बोरकर, नामदेव लांजेवार, रेखा लोथे व महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच साकोलीतील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. यादरम्यान लाखांदूर रोड ते तलाव प्रभाग महामार्गावर चोख पोलीस बंदोबस्तात राज्यपाल हरीभाऊ बागडे यांचे आगमन झाले. त्यांचे स्वागत माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते यांनी केले.