आशाताई बच्छाव
ॲडव्होकेट अजित पाटील ॲडव्होकेट. असोसिएट तर्फे नवोदित नोटरी तसेच नवोदित वकील यांचा सन्मानार्थ एक आगळावेगळा सोहळा नाशिक,(अँड विनया नागरे प्रतिनिधी)
नाशिक आज दिनांक १३ /७/२०२५जुलै रोजी हॉटेल कृष्णलीला या ठिकाणी साजरा झाला त्या सोहळ्यासाठी ॲडव्होकेट.अजित पाटील आणि असोसिएट टीमने खूप मेहनतीने अतिशय उत्कृष्ट नियोजन करून सोहळा आयोजित केलेला होता. सदर सोहळ्यासाठी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट.नितीन ठाकरे साहेब त्याचप्रमाणे उपाध्यक्ष ॲडव्होकेट. वैभव शेटे तसेच सचिव अँड डवोकेट हेमंत गायकवाड तसेच सहसचिव महिला सदस्य ॲडव्होकेट सोनम गायकर मॅडम ह्या उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थिती स्वामी विवेकानंद आश्रम त्रंबकेश्वर येथील श्रीकंठानंद स्वामी हे उपस्थित होते तसेच कॅप्टन अजित ओढेकर सर त्याचप्रमाणे नवजीवन कॉलेजची मांडवकर सर, एनबीटी कॉलेजचे प्रफुल चव्हाटे सर तसेच युनीटी फाउंडेशन चे अध्यक्ष ॲडव्होकेट एकता कदम, नाशिक महापालिका चे पदाधिकारी, कामगार संघटनेचे अध्यक्ष जिवन लासुरे, नाशिक स्टार न्यूज चे संपादक विलास सूर्यवंशी सर , भगवान पाठक साहेब ,संदीप सोनवणे साहेब याची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ॲडव्होकेट.अजित पाटील सर तसेच त्यांच्या संपूर्ण टीमने शाल व मांगल्याचे प्रतीक असलेली तुलसी चे रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या पूजनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केले, विशेष म्हणजे कार्यक्रमाचे आकर्षण असलेल्या नवोदित वकिलांचा सन्मान सोहळा ॲडव्होकेट अजित पाटील सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या होता तसेच या कार्यक्रमचे प्रास्ताविक ॲडव्होकेट पियुष सोनवणे सर यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे आभार ॲडव्होकेट सौ. विनया नागरे यांनी मानले . तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अनुजा ओढेकर यांनी केले त्याच त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अजित पाटील अँण्ड असोसिएशनच्या संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अजित सरांच्या मार्गदर्शनाखाली अँड विनया नागरे यांनी केले. नुकतेच नोटरी अधिकारी म्हणून नियुक्त झालेले अँड प्रशांत दुसाने सर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे नोटरी पदी नियुक्त झालेल्या अँड विनया अमित नागरे यांना देखील सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले . त्याचप्रमाणे विविध बँकांच्या पॅनलवर कार्यरत असलेले अँड पुष्कर बुक यांचा देखील ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ऑफिस मधील जुने एडवोकेट कैलासवासी राहुल पाटील यांच्या पत्नी श्रीमती अँड माया राहुल पाटील मॅडम व त्याची मुलगी सई ह्यांना देखील अजित सर व त्यांचे पत्नी सीमा मॅडम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तसेच नवोदित वकील झालेले अँड वैभव जाधव, अँड सविता आव्हाड, अँड कोमल सोनवणे, अँड काजल पिच्छा, अँड रितेश नंदन, अँड योगीता चौधरी या सर्वांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले करण्यात आले. तसेच श्री अंबालाल पाटील, श्री.संजय पाटील, गौरव तापकिरे,सौ.पूजा डेरे, वर्षा शेवाळे, पायल जंगम या सर्व ऑफिस टीमला देखील सन्मानित करण्यात आले.यावेळी संपूर्ण अँड अजित पाटील अँण्ड असोसिएशनच्या टिमचे परिवारातील मंडळी तसेच स्नेही उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत व खेळीमेळीच्या वातावरणात हा आनंद सोहळा पार पडला.