आशाताई बच्छाव
जाफ्राबाद बस डेपोतील ड्राइव्हर आणि कंडक्टर यांची मनमानी
जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की जाफ्राबाद बस डेपोतील ड्राइव्हार आणि कंडक्टर हे बस गाडी सुपर नसतांनाही मधले स्टॉप घेत नाही.दिनांक 13/07/2025 रोजी बस MH20 BL 3864 दुपारी दोन च्या सुमारास माहोरा बसस्टॉप वर आली असता ड्राइव्ह आणि कंडक्टर यांनी चिंचखेडा, जानेफळ, जावखेडा, आरदखेडा या स्टॉप वरील एकलाही प्रवाश्याला बसू दिले नाही दोघांचीही प्रवाशांनी खूप विनंती करतांना महिला व पुरुष पाहाव्यास मिळाले प्रवाशांनी असे सांगितले की आम्ही दोन दोन तास बसची वाट पाहत बसतो आणि बस आल्यानंतर ड्राइव्हार आणि कंडक्टर बस मध्ये घेत नाही. काही प्रवाशी आजारी असतात असे प्रवाशांनी सांगितले. तरी पण त्यांना दया येत नाही.ही बस गाडीच नाही तर अनेक बस चे असेच प्रसंग जाफ्राबाद डेपोबद्दल प्रवाशांनी सांगितले.
तसेच बस डेपो म्यॅनेजर साहेबांनी अशा ड्राइव्हर आणि कंडक्टर मनमानीकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊन प्रवाशांची हेळसांड थांबवावी अशी प्रवाशांनी विनंती केली आहे.