आशाताई बच्छाव
जनता विद्यालयाचे विद्यार्थी शेख फारूकभाई सैलानी हे हज यात्रेवरून परतल्यामुळे संपत्नीक सत्कार कार्यक्रम संपन्न
जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव सराई येथील जनता विद्यालयाचा सैलानी येथील विद्यार्थी शेख फारूकभाई वय 60 वर्ष आणि त्यांच्या पत्नी सौ. मुमताज बी हे हज यात्रा यशस्वीरीत्या पार करुन परतले. यामुळे त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम शाळेच्या वतीने 12 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षक वृंद यांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य श्री प्रमोद ठोंबरे सर होते.
त्यांच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरातील धार्मिक सौहार्द तसेच एकात्माता आणि अध्यात्मिक एकतेचा संदेश दिला. विद्यार्थ्यां समोर हे एकात्मिकतेचे प्रतीक आहे असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी बोलून दाखविली.