आशाताई बच्छाव
शेतकरी मित्र फार्मर प्रोडूसर मालेगाव येथे नैसर्गिक शेती कार्यशाळा .
हिंगोली . श्री श्रीहारी अंभोरे पाटील- नांदेड जिल्ह्यातील (मालेगाव ) येथील सेंद्रिय प्रमाणित शेतकरी कृषिभूषण श्री भगवान भाईजी इंगोले यांच्या शेतावर गावातील नैसर्गिक योगीक शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न झाली. या सभेमध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक योगीक शेतीचे महत्व सांगून शेतकऱ्यांनी आपलाशेतीवरील खर्च कमी करण्यासाठी बांधावर खते तयार करावे व शेतातील पिकांचे अवशेष उसाची पाचट, गुळी जाळून न टाकता कंपोस्ट करून शेतामध्ये पिकांना द्यावेत व शेताच्या, बांधावर झाडे लावावेत एकात्मिक पीकपद्धतीने मिश्र पीके घ्यावेत, सकारात्मक विचारातुन चिंतन करावे, शारीरिक दृष्ट्या व्यसनापासून दूर राहावे, शेतीमध्ये बांबू पासून बनवलेले ध्यान मंदिर मध्ये सर्वांनी मेडिटेशन केल्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढते पाच तत्वांचे शेतकऱ्यांना सहकार्य मिळते शेतीमध्ये अध्यात्मिक सकारात्मक विचारांचे चिंतनांचे महत्त्व आहे. गोकृपा अमृताचे वाटप करण्यात आले तसेच जीवामृत व जिवाणू युक्त जैविक स्लरी , दशपर्णी अर्क बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यशाळेसाठी प्रथमि एग्रोफाउंडेशन व इंटरनॅशनल पॅनेलेशियाच्या संस्थापक मिनी चक्रवर्ती, श्री पुरुषोत्तम धरती दान कंपनी हैदराबाद, श्री हर्षल जैन आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती निरीक्षक व त्यांची टीम श्री मंगेश कामठीकर श्री माधव गोडले श्री संजय खराडे हे शेतकरी मित्र गटातील प्रगतिशील शेतकरी अमोल सावंत, रामदास इंगोले,जळबाजी बुट्टे, मारुती सोमवारे, उमाकांत राजेवार, बेगाजी चंदेवार, पत्रकार अमोल जोगदंड ,संजय खराटे, नामदेवराव कदम, अशोक दादा इंगोले, पांडुरंग कदम, मल्लिकार्जुन मुरकुंदे , कृषी सखी अनिता सावंत, आशा खराटे , अंजना कदम, दुर्गा कदम, वंदना कदम, शालन बाई चिनके, पार्वती इंगोले महिला शेतकरी उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे लवकरच मार्केटिंग उपलब्ध होणार आहे असे मिनी चक्रवर्ती श्री पुरुषोत्तम यांनी कळविले आहे.
श्री हर्षल जैन यांनी प्रमाणीकरण कसे करायचे तसेच सेंद्रिय निविष्ठा व शेताची निगा कशी राखायची व जमीन सुपीक कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन केले. शेतकरी मित्र फार्मर प्रोडूसर कंपनीचे स्वतःचे वेअरहाऊस लवकरच तयार होत आहे. यावर मालाची प्रतवारी ग्रीडीग क्लिनिक होऊन स्वच्छ करून डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचता येईल शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होईल