Home बुलढाणा दारु पिणा-यांसाठी महत्वाची बातमी! उद्या राहणार दारू दुकाने बंद,काय आहे कारण?

दारु पिणा-यांसाठी महत्वाची बातमी! उद्या राहणार दारू दुकाने बंद,काय आहे कारण?

75
0

आशाताई बच्छाव

1001700605.jpg

‘या’ तारखेला बार राहतील बंद ! – बुलढाणा जिल्हा लिकर असोसिएशनचा निर्णय ! – काय आहे कारण?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा जिल्ह्यातील सर्व परमिट रूम आणि बार सोमवारी 14 जुलै रोजी बंद राहणार आहेत. बुलढाणा जिल्हा लिकर असोसिएशनने हा बंद पुकारला आहे. हॉटेल उद्योगावर अलीकडेच लावण्यात आलेल्या मोठ्या कर वाढीला विरोध करण्यासाठी या संपाची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत काल जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.शासनाने परमिट रूमला लावलेल्या 10 टक्के व्हॅट विरोधात सोमवारी 14 जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व बियर बार रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भ रेस्टॉरंट परमिट असोसिएशन अंतर्गत सर्व परमिट रूम परवानाधारक व्यवसाय करीत असून, शासनाने अन्यायकारक निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाकडून परमिट रूम मधील मद्य विक्री वर 10 टक्के व्हॅट टॅक्स मध्ये वाढ केली आहे.तो टॅक्स रद्द करून फस्ट पॉईन्ट टॅक्स लागू करावा तसेच शासनाकडून परमिट रूम नूतनीकरण फी मध्ये भरमसाठ वाढ केली आहे, ती कमी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणी संदर्भात व शासननिर्णयाच्या निषेधार्थ 14 जुलै रोजी परमिट रूम परवानाधारक मद्य विक्री बंद ठेवणार असल्याचे निवेदन बुलढाणा जिल्हा परमीट रूमचे अध्यक्ष किशोर गरड यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here