आशाताई बच्छाव
रुग्णांवर तात्काळ व योग्य उपचार करा!
— आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
सगनापूर विषबाधा प्रकरण — आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी रुग्णांची घेतली भेट
चामोर्शी/गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ :- तालुक्यातील सगनापूर येथील ग्रामस्थांना कडू आणि दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याची घटना घडली असून, अनेक रुग्ण सध्या चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तात्काळ चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांच्या तब्येतीची माहिती घेतली तसेच डॉक्टरांकडून सुरू असलेल्या उपचारांबाबत आढावा घेतला.
यावेळी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ आणि काळजीपूर्वक उपचार करण्याच्या सूचना दिल्या. “नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणारh नाही. प्रत्येक रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार मिळाले पाहिजेत,” असे ठामपणे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या स्त्रोतामध्ये साप निघाल्याची घटना, तसेच चार महिन्यांपासून दूषित व घाण पाण्याचा पुरवठा सुरू असल्याचे निदर्शनास आले. पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद होता, व तो पुन्हा सुरू करताना वापरलेली वेगळी पाइपलाइन विषबाधेचे मुख्य कारण ठरल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, कान्हळगाव येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मलेरिया चा आजार झाल्याचे निदर्शनास आले असून, आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची तब्येत विचारली, तसेच प्रशासनाला आवश्यक ती खबरदारी घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या भेटीप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री अनिलजी पोहनकर, भाजपा चामोर्शी तालुकाध्यक्षा सौ. रोशनीताई वरघंटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री रितेशजी पालारपवार, तसेच श्री श्रावणजी सोनटक्के, श्री माणिकजी कोहळे, श्री भास्करजी बुरे, श्री मधुकरजी भांडेकर, श्री रेवनाथजी कुसराम, श्री निरजजी रामानुजनवार, श्री भाविकजी आभारे, हर्षद भांडेकर, रामचंद्र वरवाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.