आशाताई बच्छाव
सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी
——-
शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड ः गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरुवारी (दि. 10) येवती (लघु आळंदी)ता. मुखेड) येथे श्री प.पू.सद्गुरु नराश्याम महाराज यांच्या दर्शनासाठी व गुरुमंत्र घेण्यासाठी भाविकांचा सागर लोटला होता. यावेळी महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.
दरवर्षी गुरु पौर्णिमेच्या दिवशी लघु आळंदी म्हणून ख्यातकिर्त असलेल्या येवती येथे श्री प.पू.सद्गुरु नराश्याम महाराज यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी मराठवाडा व कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यावेळी इच्छुक भाविकांना गुरुमंत्र देऊन दीक्षा दिली जाते. त्यासाठी भाविक लांबवरुन प्रवास करुन येत असतात.
मठ परिसरात अलीकडे चांगल्या पैकी भौतिक सुविधा झाल्याने भाविकांची सोय झाली आहे. यावर्षी सुद्धा गुरुवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्त पांडुरंग गोविंदराव यन्नावार पाळेकर, रा. देगलूर व भास्कर पाटील शिरूरकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. श्री.प.पू सद्गुरु नराश्याम महाराज यांनी सर्वांना दर्शन देत आशीर्वाद दिला व इच्छुक भविकांना गुरुमंत्र दिला. असंख्य तरुण भाविकांनी व्यवस्था अबाधित ठेवत भाविकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली.
गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.