आशाताई बच्छाव
मौलाना अबूल कलाम आझाद विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
——
देगलूर: शिक्षण घेताना विद्यार्थ्यानी आपल्यासमोर ध्येय ठेऊन शिक्षण घ्यावे यश नक्कीच मिळते. असे मत देगलूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एम एम चमकुडे यांनी मांडले
ते येथील मौलाना अबूल कलाम उर्दू विद्यालयात आयोजित इयत्ता दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी जमाती इस्लामी नांदेड चे काझी इमजाद अली होते. प्रमुख पाहूणे म्हणून डाॅ.मुजीब, डाॅ उस्मान उपस्थित होते यावे॓ळी उ.मा.विद्यालयातील
एमबीबीएस साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच उपप्राचार्य प्रा.चमकुडे यांना पीएचडी मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. जमाती इस्लामी नांदेड चे जहूर अहमेद यांनी करीअर बाबत मार्गदर्शन केले.देगलूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम.एम. चमकुडे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काझी सुरखान आभार रईस सर यांनी मानले