आशाताई बच्छाव
आध्यात्मिक उन्नती व सुखी जीवनासाठी गुरूंचे स्थान महत्त्वाचे
स्वामी श्री संत अनेकरुपीजी महाराज यांचे प्रवचनातून भाविकांना मार्गदर्शन
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी
प्रत्येकाच्या जीवनामध्ये तीन गुरू महत्त्वाचे असून आई आणि वडील यांच्या नंतर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला देणारा मुख्य घटक मार्गदर्शक म्हणजेच गुरु.
‘ज्याने गुरु नाही केला त्याचा धर्म वाया गेला’ त्याप्रमाणे गुरुंचे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.जीवनात यशस्वी वाटचाल करायची असेल तर गुरु महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन शिव अर्धं नारेश्वरी नाग ज्योतींलिंग धाम बिलमाळ (तुलसीगड) मठाधिपती स्वामी संत श्री अनेकरूपीजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन करताना भाविकांना केले आहे.
श्री क्षेत्र बिलमाळ (तुलसीगड) येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात झाला असून यावेळी हजारो भाविकांनी हजेरी लावून शिव अर्ध नागेश्वरी नाग ज्योतिर्लिंग अधिष्ठानाचे मठाधिपती संत स्वामी अनेकरुपीजी महाराज यांचे दर्शन घेऊन कृपाशिर्वाद प्राप्त करून घेतले.यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र – गुजरातच्या हद्दीवर असलेल्या श्री क्षेत्र बिलमाळ येथे महाराष्ट्र – गुजरातच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक उपस्थित झाले होते. दोन दिवस गुरुपौर्णिमा उत्सव चालला यात सकाळी काकडा आरती, भजन, प्रवचन, जागरण आदी कार्यक्रम झाले. सद्गुरू संत स्वामी अनेकरुपीजी महाराज यांची विधिवत पूजा शिष्यांनी केली व गुरू आरती करण्यात आली. यावेळी अनेकरुपीजी महाराज यांचे प्रवचन झाले.त्यांनी आपल्या प्रवचनात जीवनात शिष्यांनी वागावे कसे ? जीवनात गुरुंचे महत्व काय आहे ? प्रत्येक व्यक्तीने गुरु का करावा ? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जीवनामध्ये मनुष्य वाटचाल करत असताना त्याचे कर्म महत्त्वाचे असतात.ते पुढे म्हणाले की, जीवनाची वाटचाल यशस्वी करायची असेल तर गुरू महत्त्वाचा ठरतो. आध्यात्मिक उन्नती व सुखी जीवनासाठी गुरूंचे स्थान महत्त्वाचे आहे. यावेळी अनेकांच्या समस्यांचे निराकरण अनेकरुपीजी महाराजांनी केले. गुरु पौर्णिमेनिमित्त उपस्थित भाविकांनी शिवलिंगावर ही अभिषेक केला. यावेळी भाविकांच्या जय जय काराने परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.