आशाताई बच्छाव
नगरसेविका स्नेहल खोरे यांच्या प्रयत्नांना यश; नाल्याच्या भूमिगतकरणासह विविध मागण्या मान्य
पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण; जनतेच्या समस्यांवर तातडीने निर्णय
श्रीरामपूर (प्रतिनिधी दिपक कदम) – महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांतील महत्त्वपूर्ण विकासकामांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रभागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या मांडण्यात आल्या असून, नगरसेविका सौ. स्नेहल केतन खोरे व मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील यांनी दिलेल्या निवेदनावर ना.विखेंनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी सभापती दिपक पटारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, जि.प.सदस्य शरद नवले, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, रवी पाटील, वैशाली चव्हाण, अभिषेक खंडागळे, संजय गांगड, मनोज लबडे, राजू आदिक, सोमनाथ गांगड आदी उपस्थित होते.
शहरातील सांडपाण्याचा उत्सव मंगल कार्यालय ते महाले पोदार स्कूल दरम्यानचा नाला (चर) हा परिसरातील प्रमुख समस्या आहे. या नाल्याचे सिमेंट काँक्रेटीकरण करून भूमिगत करण्याची मागणी नगरसेविका सौ. स्नेहल खोरे यांनी केली. पालकमंत्री विखे पाटील यांनी तात्काळ या मागणीची दखल घेत उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक किरण सावंत व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना प्रस्ताव सादर करून त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
यासोबत नगरसेविका स्नेहल खोरे यांनी भोंगळ वस्तीतील पाणीपुरवठा पाईपलाईन जोडण्याची, पूर्णवादनगर टीपी रिझर्व्हेशन काढण्याची आणि प्रभागासाठी वाढीव निधी मंजूर करण्याची विनंती केली. या सर्व मुद्द्यांवर पालकमंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना यावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पूर्णवादनगरमधील टीपी रिझर्व्हेशनचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यात अडचणीमुळे स्थानिकांना घरकुल अनुदान मिळण्यास अडथळे येत आहेत. खोरेंच्या प्रयत्नाने येथील डीपी रिझर्व्हेशन रद्द झाले आहे. प्रभागाच्या विकासासाठी केतन खोरे व स्नेहल खोरे या सातत्याने कार्यरत असून त्यांच्यामुळे शहर विकासात हा प्रभाग प्रथमस्थानी आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी विजय पाटील, सुदर्शन शितोळे, विजयकुमार शर्मा, मनोज होंड, मनोज नागरे, विवेक भोईर, अनिल उनवणे, प्रमोद कु-हे, मोघले साहेब, बी.एम.पवार, पंकज बनकर, विशाल रुपनर, तुषार चांडवले, महिला शहराध्यक्ष पुष्पलता हरदास, पूजा चव्हाण, सीमा पटारे, अलका राऊत, वर्षा भोईर, अनिल पंडित, राहुल सागडे, सीमा पाठक, लता जगताप, मंगल शितोळे, शुभांगी सातपुते, रेखा होते, नूतन माळवे, अग्रवाल भाभी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.