आशाताई बच्छाव
उमरगा तालुक्यातील डिग्गी गावात अडीच एकर क्षेत्रात हिरवळीने बहरले माळरान.
———————————————
धाराशिव उमरगा : तालुक्यातील मौजे डिग्गी हे गाव कर्नाटक सिमेलगत व तसेच उमरगा तालुक्यातील बॉर्डरवरचे गाव.तसे पाहता हे कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत राहतेच.कधी गावातील अवैध धंद्यामुळे,कधी ग्रामंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे तर कधी गावातील दोन चार चांगल्या सामाजिक उपक्रमामुळे.असाच एक सुंदर उपक्रम गेल्या सात वर्षांपूर्वी रोटरी क्लब उमरगा,आर्ट ऑफ लिव्हिंग व गावातील काही प्रमाणिक बोटावर मोजण्याइतके वेढे समाजसेवक.कारण ही तसेच आहे डिग्गी साठवण तलावाच्या खालील बाजूस एक सुन्न डोंगर त्यावर झाडे येणे म्हणजे एक वेडेपणाच.परंतु रोटरी क्लबचे त्यावेळचे सचिव प्रा.युसूफ मुल्ला तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ.उदय मोरे,कृषीभूषण महामुनी यांच्या डोक्यात एक सुपीक कल्पना आली.काही ही करून येथे वृक्ष लागवड करायची आणि गावातील काही मोजक्या समाजप्रेमीना घेऊन हे कार्य चालू झाले.बऱ्याच जणांनी सहकार्य केले त्या डोंगरावर माती टाकायचे काम,चरे खोदण्याचे काम निव्वळ अल्प दरात करून दिले.प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली काही कृषी विभागाकडून,काही रोटरी कडून काही आर्ट ऑफ लिव्हिंग कडून झाडे देण्यात आली.पण ती दिलेली झाडे अगदी आठ ते दहा महिन्याची काही एक वर्षाची.असे करून जवळपास एक हजाराच्या वरती झाडे लावण्याचे काम चालू झाले.यात गावातील होतकरू तरुण,ज्येष्ठ नागरीक तसेच महात्मा गांधी विध्यालयाच्या विध्यार्थ्यांनी व तेथील शिक्षक यांनी सहकार्य केले.आणि एकदाची झाडे लावण्यात आली.झाडे लावली गेली परंतु त्याला जगवायची कशी हा सर्वात मोठा प्रश्न.झाडे लावणं सोप्प पण ते जगविणे खूप अवघड काम.परंतु भगवान के घर देर है मगर अंधेर नहीं या उक्तीप्रमाणे गावातील दानशूर व्यक्ती राजेराम पाटील यांनी साठवण तलावाची पाईपलाईन व मोटर दिली.पण मोटर मिळाली खरी याला पाणी कोण देणार असा प्रश्न उद्भवत असतानाच राजू कुलकर्णी,सिद्धाराम हत्तरगे,सुनील बालकुंदे, रियाज पठाण,रशीद शेख,चांद शेख,या समाज सेवकांनी पुढे होण्याचे धाडस दाखवून आज त्या डोंगराला एक नाविण्यमय करून दाखविले.तालुक्यतील सध्या तो एक आदर्श मॉडेल आहे.या मॉडेलला धाराशिव जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ मॅडम यांनी भेट दिली होती व या उपक्रमाचे कौतुक केले होते.तसेच युवा नेते किरण गायकवाड, जकेकुर वाडीचे आदर्श सरपंच अमर सूर्यवंशी,समाज विकास संस्थेचे भूमिपुत्र वाघ व कैलास शिंदे यांनी देखील भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले होते.येत्या एकोणवीस जुलैला जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्ष लागावड होणार आहे.पण वेळ असेल तर तालुक्यातील व जिल्ह्यातील अधियाकऱ्यांनी लोकप्रतिनिधिनी एकदा या मॉडेलला भेट द्यावी हिच प्रांजळ अपेक्षा.
झाडे लावा ! झाडे जगवा !!