आशाताई बच्छाव
जिवंत व्यक्तीला मृत दाखवून सहा लाख अठ्याहत्तर हजार लाटले!
जालना जिल्ह्यातील मंठा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल
जाफ्राबाद जालना जिल्हा प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या कामगार कल्याण योजनेतील 6 लाख 78 हजार रुपयांचे अनुदान लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बोगस कामगार प्रकरणी हा चौथा गुन्हा जालना जिल्ह्यात दाखल झाला आहे.यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर येथील सरकारी कामगार अधिकारी गोविंद गावंडे यांनी मंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे गावंडे यांच्यासह दक्षता पथकातील अधिकारी आकणी गावात भेट देऊन तीन व्यक्तींबाबत माहिती घेतली संबंधित स्वाती शिवाजी उबाळे,देवराव नारायण बदर व दुर्योधन रामभाऊ जाधव या तिघांचे कागदपत्र खोटे असल्याचे चौकशी स्पष्ट झाले आहे.
ग्रामसेवक खेडकर यांनी यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले की वरील तीनही आखणी गावचे रहिवासी नाहीत तसेच ग्रामपंचायतीकडून कोणतेही मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले नाही मात्र संबंधित नातेवाईक व दलालांनी बनावट मृत्यू प्रमाणपत्र ग्रामपंचायतचे सही व सिक्के वापरून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात शिवाजी लक्ष्मण उबाळे, कमल देवराव बदर आणि तेजस दुर्योधन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संतोष माळगे पुढील तपास करत आहे.