आशाताई बच्छाव
आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या दोन जनास चंदनझिरा पोलिसांनी केले अटक आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी
जाफ्राबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
पोलीस ठाणे चंदनझिरा हद्दीतील नवीन मोंढा भागातील दिनांक 05/07/2025 रोजी इसम नामे सुभाषचंद्रजी व्यंकटलालजी पटवारी राहणार मोदीखाना जालना याने वीष प्रशांत करून आत्महत्या केल्यामुळे त्याचा मुलगा राजेश सुभाष पटवारी याने जालना शहरातील पोस्टे चंदनझिरा येथे गुं.र.न. 326/2025 कलम 108 3(5) भा.न्या.सं. प्रमाणे ज्यांना शहरातील पाच लोकांविरुद्ध पटवारी यांना हात उसने व व्याजाच्या पैशाच्या त्रासामुळे आत्महत्या प्रवृत्ती केले असा गुन्हा दाखल केला होता.
सदर आत्महत्येच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चंदनझिरा पोलीस ठाण्याचे बाळासाहेब पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्री सुशील चव्हाण व अंबलदार यांचे पतंग तयार करून आरोपी नामे नरेश उर्फ लाला रामेश्वर हॉटेल राहणार नाथबाबा गल्ली दोन चेतन नंदलाल भुरेवाल राहणार मिशन हॉस्पिटल जवळ या दोघांना रात्री उशिराने अटक करून आज रोजी मा.न्यायालयात हजर केल्याने मा. न्यायालयाने सदर आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब पवार सपोनी श्री सुशील चव्हाण पोहेकॉ. कृष्णा तंगे अशोक जाधव पोना अभिजीत वायकोस पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ पाटील,दीपचंद डेहंगळ यांनी केली आहे