Home पुणे हिंजवडीसह सात गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे उपमुख्यमंत्री...

हिंजवडीसह सात गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे……. (समावेशाची तत्काळ कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश)

41
0

आशाताई बच्छाव

1001680085.jpg

हिंजवडीसह सात गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत घ्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे……. (समावेशाची तत्काळ कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश)

(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दी लगत असलेली आयटी पार्क हिंजवडी, माण, मारूजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही सात गावे महापालिकेत घ्यावीत. त्यामुळे या गावांचा नियोजनबद्ध विकास होईल, असे साकडे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. त्यावर समावेशाची तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले. खासदार बारणे आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी सोमवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्थानिक नागरिक, आयटीएन्स यांच्यासोबत भेट घेतली. आयटी पार्कची जलकोंडी, वाहतूक कोंडी याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी शिंदे यांना दिली. याबाबतच्या मागणीचे निवेदन दिले. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीलगत हिंजवडी, मारूंजी, नेरे, जांभे, सागंवडे, गहुंजे ही गावे आहेत. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. आयटीनगरी असलेल्या हिंजवडीचा विकास होणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीला नागरिकांना सुविधा देणे शक्य होत नाही. सुविधांसाठी नागरिकांनी गावांचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी केली आहे. मावळ, मुळशी तालुक्यात असलेली ही गावे महापालिकेच्या अगदी जवळ आहेत. या भागात अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. नैसर्गिक नाले बुजविले जात असून वळविले जात आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हिंजवडी जलमय झाली. नदीलाही गटारीचे स्वरूप आले आहे. या गावांची जबाबदारी पीएमआरडीएकडे आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. बांधकामावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. त्यामुळे या परिसराला बकालपणा येत आहे. वाहतूक कोंडी, विविध समस्यांमुळे या भागातील नागरिक पिंपरी-चिंचवडमध्ये राहण्यास प्राधान्य देत आहेत. हिंजवडी, माण या क्षेत्रात मोठ्या भागत आयटी पार्क आहे. देशभरातील नागरीक येथे येतात. वाढते नागरीकरण, सुविधांचा अभाव, वाहतुकीची समस्या या गोष्टींचा विचार करून ही गावे महापालिकेत येण्याची आवश्यकता आहे.
गहुंजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहे. या गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुरेसे नसल्याने अशुद्ध पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे पवना नदीचे प्रदुषण वाढले आहे. गावांचा विकास, नागरीकांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात आणि अनाधिकृत बांधकाम रोखण्याच्या दृष्टीकोणातून हिंजवडी, माण, मारूंजी, नेरे, जांबे, सांगवडे आणि गहुंजे यां गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करावा. या भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

Previous articleअवैध शस्त्रासह दोन संशयितांना अटक; जाफ्राबाद पोलिसांची मोठी कारवाई
Next articleआत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या दोन जनास चंदनझिरा पोलिसांनी केले अटक आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here