आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपुरा विठू माऊलीचा गजर भावीकांची मानदियाळी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासह वर्धा नदीचे पूजन महाआरती. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. ( कौंडण्यपूर ) अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाच्या जय घोषात परिसरातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवारी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात प्रामुख्याने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजन, भजन, किर्तन, दिंडी सोहळे आणि उपासाचे पदार्थ भाविकांना वाटप होणार आहे दिवसभर मंदिरामध्ये भाविका ंची दर्शन घेण्यासाठी मानदियाळ असणार आहे. तसेच शहरातील अमरावतीतील आंबा गेट बुधवारा या ठिकाणी असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही अभिषेक व महाआरती सोहळा पार पडणार आहे. आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथे आहे हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णूसाठी या पवित्र दिनाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात तसेच कोंडणेपुरातही भाविक दर्शनासाठी येतात. पंढरपूर हे रुक्मिणी मातेचे आणि पाच सतीचे माहेर आहे. प्रभू रामचंद्र ची आजी राजा दशरथ ची आई इंदुमती अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा भगीरथ राजाची माता केशरी व नलराजाची राणी दमयंती तसेच चौरंगी नाथाचे जन्मस्थान महाभारत कालीन यापुढे तीर्थक्षेत्रात रुक्मिणीचे जन्मस्थान आणि पाच सतीचे माहेर आहे. जवळच अंबिका मातेचे पुरातन मंदिर आहे. याच मंदिरातून भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीमद् भागवत श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हल केले श्रीमद् भागवतात याचा उल्लेख आहे. वशिष्ठ ( आजची वर्धा ) नदीच्या काठावर पुरातन मंदिर आहे येथे जवळपास ४५१ वर्षापूर्वी संत सद्गुरु सदाराम महाराज होऊन गेले. राजाराम महाराजांनी कौंडण्यपुरते पंढरपूर अशी वारी १९५४ मध्ये सुरू केली ती परंपरा अजूनही सुरू असून वारीचे पायदळ दिंडीचे हे ४३१ वे वर्ष आहे. रुक्मिणी मातेच्या माहेरहून निघालेली ही महाराष्ट्रातील एकमेव मानाची पालखी आहे. सदाराम महाराजांनी कारंजा लाड व कौंडण्यपूर या दोन्ही कर्मभूमीत विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर बांधले पांडुरंगाच्या आदमीवरून सदाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. तेव्हापासून कार्तिक आणि आषाढी मासात येथे यात्रा भरते. विदर्भातून अनेक पायदळ दिंड्या येतात व प्रतिपदेला दहीहंडा ही दहीहंडी सोहळा होतो पांडुरंगाच्या या ठिकाणी वास असतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. तसेच जे भावी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ शकले नाही ते आषाढी एकादशीच्या दिवशी कौंडण्यपूर येथे दर्शनासाठी येतात पहाटे ५ वाजता विठ्ठल रुक्मिणी अभिषेक सोहळा होणार आहे त्यानंतर भाविकांच्या उपस्थित सकाळी ६ वाजता महा आरती होईल. नंतर दिवसभर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले राहणार आहे यावेळी रुक्मिणी मातेला हार श्रीफळ वटी अर्पण करण्यात येते तसेच भाविक वर्धा नदीवर स्नान करून पूजा करतात येथे दिवसभर मंदिर संस्थांच्या वतीने भाविकांसाठी फराळ वाटप करण्यात येणार आहे यासाठी मंदिर विश्वस्त मंडळ परिश्रम घेत आहे. कौंडण्यपूर येथून गेलेली पालखी ही ११ तारखेला परत येते त्यानंतर दिवसभर पायदळ वारकरी भक्तांच्या पालखीचे स्वागत व दर्शनासाठी एकत्र येतात यावेळी विदर्भातून सगळ्या पालकात जमा होतात त्याआधी अनेक ठिकाणी रिंगण सोहळा पार पडणार आहे त्याच दिवशी दुपारी४ वाजता दहीहंडी उत्सव सोहळा साजरा होणार आहे या दिवशी परिसरात मंदिर परिसरात यात्रा भरते तसेच दिवसभर धार्मिक कार्यक्रम असते