Home वाशिम मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांना सामान्य लोकांच्या वतीने निरोप!

मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांना सामान्य लोकांच्या वतीने निरोप!

327

आशाताई बच्छाव

1001669949.jpg

मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांना सामान्य लोकांच्या वतीने निरोप!

वाशिम : ( गोपाल तिवारी ब्युरो चीफ )
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची मुंबई येथे बदली झाली आहे.
त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांची एक आदर्श छबी जिल्ह्यात निर्माण झाली होती.
त्यांच्या या आदर्श कार्याची दखल घेत सामान्य नागरिकांच्या वतीने “वुई सपोर्ट सीईओ” ग्रुपच्या वतीने दि. 4 जुलै रोजी जि. प. मध्ये सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.

मागील 17 महिन्यांपूर्वी वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वैभव वाघमारे हे रुजू झाले होते . त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्वप्रथम जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांना आपल्या दैनंदिन कार्याची जाणीव करून देत शिस्त लावली. यानंतर सर्वच विभागांचे कार्य उत्कृष्टरित्या सुरू झाले. प्रत्येक कर्मचारी आपली जबाबदारी योग्य रितीने सांभाळत होते. याचा परिणाम म्हणजे जनतेची कामे वेळेत व्हायला लागली. भ्रष्टाचारावर नियंत्रण आले.
सीईओ वाघमारे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना रंगरंगोटी करून शाळांचा परिसर सुशोभित केला.
यामुळे शाळा बोलू लागल्या, शिक्षकांना ज्ञानदान करण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले. अनेक शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास सुरुवात केली.
साहेबांनी आपल्याकडे तक्रारी घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकास आपले दालन सदोदित खुले ठेवले. त्यामुळे नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लागत होत्या. त्यांच्या या कार्यामुळे जिल्ह्याचे मिनी मंत्रालय आदर्शवत अशी कामगिरी करत होते. असे असताना तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली अतिरिक्त विकास आयुक्त औद्योगिक विभाग मुंबई येथे झाली.
त्यांची वाशीम येथून बदली झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली. शासनाने कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच साहेबांची बदली का केली. असा प्रश्न सामान्य जनता विचारू लागली होती.
त्यामुळे ” साहेब आपण आम्हाला हवे आहात” असे म्हणत अनेक सामान्य नागरिकांनी सीईओ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी सीईओ वाघमारे यांच्याशी हितगुज करतांना साहेबांच्या उत्कृष्ट कार्याप्रती अनेक जणांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. साहेब, आपण आम्हाला हवे आहात, आमच्या आकांक्षित जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी आपण पाहिजे होतात, अशी आर्त हाक उपस्थितांनी दिली.
यावेळी शासनाने बदली केल्यामुळे मला जावे लागेल. असे सांगून आपण मला भरभरून प्रेम दिले. सहकार्य केले म्हणूनच मी चांगले कार्य आपल्या जिल्ह्यात करू शकलो. असे उद्गार सीईओ वाघमारे यांनी काढले. यावेळी अनेकांनी साहेबांच्या कार्याप्रती मनोगत व्यक्त केले.
शुक्रवारी दुपारी वी सपोर्ट सीईओ ग्रुपच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सामाजिक, राजकीय, पत्रकारिता तथा विविध क्षेत्रातील नेतृत्वकर्ते उपस्थित होते. यामध्ये, डॉ. भगवानराव गोटे, इंजि. सिताराम वाशिमकर, विनोद पट्टेबहादूर, राजकुमार पडघान, अतिश देशमुख, परमेश्वर अंभोरे, विजयराव शिंदे, गजानन इढोळे, राजू कोंघे, गजानन धामणे, मिलिंद सुर्वे, विनोद तायडे, पप्पू घुगे , रंजनाताई पारिस्कर, दिलीप अवगण, प्रविण पट्टेबहादूर, दत्ता शिंदे, सुनीता कांबळे, अतुल राऊत आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

फोटो कॅपशन : मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचा सत्कार करताना वी सपोर्ट सीईओ ग्रुपचे सदस्य.

एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली अथवा सेवानिवृत्ती निमित्त त्यांना निरोप समारंभ देण्याची शासकीय प्रथा सर्वश्रुत आहे. मात्र, लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासकीय सेवा देऊन बदली झालेले कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांना अधिकारी, कर्मचाऱ्याऐवजी जिल्ह्यातील सामान्य जनतेचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषदेमध्येच कार्यक्रम घेऊन वाघमारे यांना निरोप दिला. ही ऐतिहासिक आणि अभुतपूर्व अशी घटना आहे. सरकारी अधिकारी- कर्मचारी म्हणजे जनतेचे सेवक असा संकेत आहे. त्यानुसारच सीईओ वाघमारे यांची कारकीर्द राहिली आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांनी हा संकेत पायदळी तुडवला असल्याचे बोलल्या जात आहे.

Previous articleजिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सहकार दिंडीचे आयोजन.
Next articleधाराशिव जिल्ह्यात किल्ले परंडा येथे सापडली पुरातन शिवपिंड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.