आशाताई बच्छाव
या ग्रामसेवकाला जयंती साजरे करण्याचे वावडे ! – हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा ग्रामपंचायतीला विसर ! – ग्रामसेवकाने नकार दिल्याने ग्रामस्थांनीच केली जयंती साजरी ! ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवले बेशरमचे झाड!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा सर्वत्र 1 जुलै रोजी कृषि दिन व माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती साजरी होत असते. परंतू तालुक्यातील पळसखेड नाईक / नागो ग्रामपंचायतीला या जयंतीचा विसर पडल्याने विठ्ठल राठोड यांनी कारणीभुत असलेल्या नितीन इंगळे या ग्रामसेवकाला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी गट विकास अधिकारी यांचेकडे आज निवेदनातून केली आहे.
पळसखेळ नागो गावात 90 टक्के बंजारा समाजबांधव आहे. त्यामुळे आज एक जुलै रोजी शेतकरी, कामगार, विद्यार्थी व ग्रामस्थ माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती उत्सहात साजरी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी 7 वाजता हजर होते. दरम्यान ग्रामसेवक नितीन इंगळे यांना वारंवार दुरध्वनीवरून कार्यालय उघडण्यासाठी सांगितले असता, त्यांनी जयंती साजरी न करण्याचे सांगून येण्यास नकार दिला. त्यामुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, सदर ग्रामसेवकाला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामस्थांनी व राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बंद असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर जयंती साजरी केली. यावेळी वृक्षाचे वाटप करण्यात आले. दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेशरमचे झाड ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.