आशाताई बच्छाव
जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एका इसमास एक पिस्टल व सहा जिवंत काडतूसांसह केले जेरबंद
जाफ्राबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 01/07/2025 रोजी जालना जिल्ह्यातील अवैद्य गावठी पिस्टल बाळगणाऱ्या किस्मत ची माहिती घेऊन त्याचा शोध घेणे कामी विशेष मोहीम राबवणे संदर्भात मा पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांचे सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षण श्री पंकज जाधव सो यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पत्र तयार करून त्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केल्याने सदरचे पथक हे जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्र गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमाची माहिती घेत असताना व गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की इसम नामे महेश विष्णू निचाळ रा. शिंदे वडगाव ता. घनसावंगी जि. जालना हा पानेवाडी ते राजेगाव रोडने कमरेला पिस्टल लावून तो फिरत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने सूर्याची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पानेवाडी ते राजेगाव रोडवर पानेवाडी शिवारात रस्त्याने समस्यास्पद एकस मिळून आला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश विष्णू निचळ वय 26 वर्षे राहणार शिंदे वडगाव ता. घनसावंगी जि. जालना असे असल्याचे सांगितले व खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीमध्ये असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात व कब्जात त्याचे कमरेला खोचलेली एक गावठी पिस्टल व सहा जिवंत काडतूस मिळून आल्याने सदर आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे घनसावंगी येथे कलम 3/25 आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल,मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी व श्री विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब उपविभाग अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव,सपोनी श्री योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र वाघ,पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ, देविदास भोजने,ईशाद पटेल,सागर बाविस्कर,संदीप चिंचोले,दत्ता वाघुर्डे, सोपान शिरसागर,धीरज भोसले, योगेश सहाने, चालक अशोक जाधवर सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.