Home जालना व्यवसाय अपडेटसाठी २० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद

व्यवसाय अपडेटसाठी २० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद

67

आशाताई बच्छाव

1001661511.jpg

व्यवसाय अपडेटसाठी २० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद
मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचा २८ वा वर्धापन दिन
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: मराठवाड्यातील आठ लाख व्यापारी वर्गांचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव संस्था ,मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स च्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त २० जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे व्यापार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस चेंबरचे सदस्य तसेच जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील निवडक  पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत मराठवाड्यातील ३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर विचार मंथन होऊन ठोस ठराव मांडले जाणार आहेत. त्यामध्ये स्वतंत्र व्यापार मंत्रालय स्थापन करण्याची मागणी तसेच व्यवसाय कर रद्द करण्यासंबंधीचा ठराव, वन नेशन वन टॅक्स व वन रेटचा फायदा थेट ग्राहकापर्यंत पोहोचवणे, ग्राहकभिमुख बाजारपेठेसाठी पोषक वातावरण निर्मिती करणे, प्रत्येक जिल्ह्यात व्यापाऱ्यांच्या समस्यांवर मोकळा संवाद, महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा जास्तीचे असणारा विजेचा दर अशा विविध विषयांवर चर्चा होऊन ठोस ठराव मांडले जाणार आहेत. हे संमत झालेले ठराव राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून मान्यता घेतली जाणार आहे. या परिषदेस जिल्हा व गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष आदेशपाल सिंग छाबडा, माजी अध्यक्ष प्रफुल्ल मालानी,महासचिव शामसुंदर लोया , कोषाध्यक्ष विकास साहुजी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेंद्र  रेदासनी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत राठी, गजानन घुगे सूर्यकांत हाके पाटील, संजय मोदानी, सचिव संतोष कावळे पाटील, जफर मिर्जा, सहसचिव संजय दाड, संदीप लाहोटी यांनी केले आहे.