Home नांदेड डॉक्टर डे निमित्त देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सन्मान.

डॉक्टर डे निमित्त देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सन्मान.

85

आशाताई बच्छाव

1001661453.jpg

डॉक्टर डे निमित्त देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सन्मान.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगलूर- डॉक्टर डे निमित्त उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा पत्रकार संरक्षण समिती, देगलूर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर, डॉ. मलशेटवार, डॉ. उस्मान सर, डॉ. काझी, डॉ. नुकुलवाड, डॉ. सचिन गायकवाड तसेच इतर डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन्मान समारंभात डॉक्टरांना शाल व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष शेख असलम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “डॉक्टर हा समाजातील खरा आधारस्तंभ आहे. विशेषतः कोरोना काळात डॉक्टर्सनी जीव धोक्यात घालून समाजाची सेवा केली आहे. अशा सेवाभावी व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटतो.”
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांनी पत्रकार संरक्षण समितीच्या या उपक्रमाचे कौतुक करत, संपूर्ण टीमचे आभार मानले आणि भविष्यातही असे उपक्रम राबवत राहावेत, अशी शुभेच्छा दिल्या.
या वेळी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम, सचिव गजानन टेकाळे, कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, सहकार्यध्यक्ष धनाजी जोशी, संघटक श्वेता चिदमलवाड, सहसंघटक प्रभु वंकलवार, सदस्य इस्माईल खान, शेख अफन आदी उपस्थित होते.

Previous articleमनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटीत भेट; बळवंतराव पाटील यांनी केली तब्येतीची विचारपूस
Next articleलक्ष्मीकांत कद्रेकर यांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.