आशाताई बच्छाव
अमरावती विद्यापीठ च्या पीएचडी कोर्स वर्क परीक्षेची तयारी पूर्ण १३ जुलैला परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षक केंद्र नियुक्त. दैनिक युवा मराठा पी एन देशमुख. जिल्हा प्रतिनिधी. अमरावती . संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आचार्य पदवी आचार्य कोर्स वर्क परीक्षा१3 जुलै रोजी होणार आहे ही परीक्षा सकाळी ११ ते दुपारी 2 या वेळात घेण्यात येईल विद्यापीठ मध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र नियुक्त केले आहे अमरावती विद्याभारती महाविद्यालय परीक्षा होईल अकोल्यात सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परीक्षा घेतली जाईल बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मधील जी एस विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय हे परीक्षा केंद्र असेल यवतमाळ मध्ये अमोलकचंद महाविद्यालय आणि राजस्थान आर्य कला मिठूलालजी कचोल्या वाणिज्य महाविद्यालय परीक्षा होईल वाशिम येथे सत्यनारायण जी रामकृष्ण राठी विज्ञान महाविद्यालयात परीक्षा घेतल्या जाईल. परीक्षेचे प्रवेश पत्र संशोधन केंद्राच्या लॉगिन आयडी मध्ये ५ जुलै पर्यंत उपलब्ध होतील परीक्षेच्या१ तास आधी पियुस सॉफ्टवेअर मधून प्रश्नपत्रिका ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जातील . परीक्षा केंद्राधिकारी आणि सहा सहकेंद्राधिकारी यांना प्रश्नपत्रिका च्या झेरॉक्स ची जबाबदारी दिलेली आहे विद्यार्थ्यांचे गुण २४ ते२१ जुलै दरम्यान संशोधन केंद्राच्या लॉगिन आयडी मध्ये भरावे लागतील ऑफलाईन गुण स्वीकारले जाणार नाही परीक्षा व मूल्य पण मंडळाचे संचालक डॉक्टर नितीन कोळी यांनी सर्व संबंधितांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी आचार्य कक्षाच्या उपकूल सचिव मीनल मालदुरे यांच्याशी संपर्क साधता येईल.