Home नांदेड सहशिक्षक श्री कल्याणराव विरभद्र थळपती यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

सहशिक्षक श्री कल्याणराव विरभद्र थळपती यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

38

आशाताई बच्छाव

1001657571.jpg

सहशिक्षक श्री कल्याणराव विरभद्र थळपती यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे 

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील रहिवासी सहशिक्षक श्री कल्याणराव विरभद्र थळपती हे हाळणी येथे कार्यरत होते शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी होते नी स्वार्थ आणि प्रामाणिक पणे शिक्षक म्हणून आपली ओळख ठेवला म्हणून आज सेवा संपल्याने सेवा नीवृत्तीचे समारंभ दापका ( गु. ) येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेच्या वतीने दि.३० जुन २०२५ सोमवार रोजी शाळेच्या प्रांगणात सत्कारमूर्ती सहशिक्षक श्री कल्याणराव विरभद्र थळपती यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी श्री येवतीकर साहेब,प्रमुख पाहुणे सुभाष पाटील दापकेकर, गट शिक्षणाधिकारी होनधरने,या बरोबरच केंद्रिय मुख्याध्यापक अतनुरे सर, सरपंच झटकोटे, उपसरपंच शादुलसाब,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दापकेकर , सर्व शाळेचे शिक्षक, व्यंकटराव नाईक बेन्नाळकर, भाजपाचे हेमंत खंकरे सहशिक्षक पंचगट्टे सर, केंद्र प्रमुख कराळे, केंद्रे प्रमुख शिवाजी वाडिकर, नागेश शिंदे,अशोक देवकत्ते, विजयकुमार स्वामी,गावातील सर्व नागरिक, अंगणवाडी सेविका व समाज सेवक उपस्थित होते.मुक्रमाबाद येथील मित्रांकडून मोठा सत्कार करण्यात आला.थळपती सरांचे सह कुटुंब सह परिवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना भद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन जाधव यांनी मांडली.