आशाताई बच्छाव
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ७० व्या वर्धापन निमित्त माडज येथे वृक्षारोपण
धाराशिव उमरगा:उमरगा तालुक्यातील माडज येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माडज स्टेट बँक ऑफ इंडिया चा ७० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .वर्धापन दिनानिमित्त रांगोळी, रंगबेरंगी फुगे ,आकर्षक सजावट करण्यात आली. ग्राहकांना पेढे, गिफ्ट देण्यात आले. ग्रामीण प्रशाला येथे वृक्षारोपण, बँक सभोवताली वृक्षारोपण शाखाधिकारी अनिरुद्ध बोरकर माडज गावचे सरपंच सारिका पाटील दिव्य मराठी प्रतिनिधी अमोल सुरवसे बँक सखी मीरा गायकवाड रोकड अधिकारी अजिंक्य हेडाऊ हर्षल माने, तुकाराम माने यांच्या हस्ते रूप वृक्षारोपण करण्यात आले स्टेट बँक ऑफ इंडिया भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२ साली ६०वा क्रमांक लागतो.शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकेल.१८०६ मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापलेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. डिसेंबर २०१२ची मालमत्ता विचारात घेता, ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून हिची ५०१ अब्ज डॉलर मालमत्ता व १५७ परदेशी कार्यालये धरून एकूण १५०३७ शाखा होत्या.मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत.एसबीआय अनिवासी भारतीयांना (एनआरआय) भारतातील आणि भारताबाहेरील शाखांच्या नेटवर्कमधून बँकिंग सेवा पुरवते. एसबीआयच्या भारतात १७ स्थानिक मुख्य कार्यालय असून सध्या देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ५७ प्रशासकीय कार्यालये आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया हि देशातील सर्वात मोठी बॅंक असून बँक मधे टोटल डिपॉझिट च्या 23% वाटा हा स्टेट बँक ऑफ इंडिया मधे आहेवृक्ष लागवडीचे फायदे:
पर्यावरण संतुलन:
वृक्ष कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात, ज्यामुळे हवा शुद्ध होते.
मातीची धूप थांबवते:
झाडांची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे मातीची धूप कमी होते.
पावसाचे प्रमाण वाढवते:
वने पावसाचे प्रमाण वाढविण्यात मदत करतात.
नैसर्गिक आपत्ती कमी करते:
पूर आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करते.
जैवविविधता वाढवते:
विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी झाडांवर अवलंबून असल्याने, वृक्ष लागवड जैवविविधता वाढवते.
आर्थिक उत्पन्न:
फळझाडे आणि इतर उपयुक्त झाडे लावून, शेतकरी अधिक उत्पन्न मिळवू शकतात.
सुंदरता:
वृक्ष आणि जंगले निसर्गाला सौंदर्य देतात. अशी माहिती शाखा शाखाधिकारी अनिरुद्ध बोरकर यांनी ग्राहकांना व विद्यार्थी यांना दिली यावेळी ग्रामीण प्रशाला माडज येथील शिक्षक वर्ग ,
विद्यार्थी ,तसेच शुभम इंगळे, अर्जुन सुरवसे, अलका गुरव, ज्योती भोसले अविनाश माने गोविंद काळे तसेच ग्राहक केंद्र चालक उपस्थित होते