आशाताई बच्छाव
EXCLUSIVE एलसीबीची खुर्ची आता सुनील अंबुलकरांकडे! – अशोक लांडे यांची CRO ला रवानगी !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा कणा म्हणून परिचित असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी सर्वांचे लक्ष लागून असताना, जिल्हा विशेष शाखा प्रमुख सुनील अंबुलकर यांची या पदावर वर्णी लागली तर पोलीस निरीक्षक अशोक लांडे हे CRO ला रवाना होणार असल्याची माहिती रात्री उशिरा प्राप्त झाली आहे.
मावळते एलसीबी चे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचा कार्यकाळ डिसेंबर 2025 रोजी संपणार होता. परंतु अवेळी लांडे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी सुनील अंबुलकर आले असून, ते एलसीबीची कमान सांभाळणार आहेत. सुनील आंबुलकर यांनी यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत दुय्यम अधिकारी, अमडापूर, खामगाव शहर, जळगाव जामोद व शेगाव शहर ठाणेदार म्हणून उत्कृष्ट कर्तव्य बजावले आहे. आता जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील अंबुलकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट भूमिका निभवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.