Home बुलढाणा गजानन कवळासे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार शिवभक्तावरील हल्ला प्रकरणात नागपूर खंडपीठात याचिका

गजानन कवळासे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार शिवभक्तावरील हल्ला प्रकरणात नागपूर खंडपीठात याचिका

99

आशाताई बच्छाव

1001656552.jpg

गजानन कवळासे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार
शिवभक्तावरील हल्ला प्रकरणात नागपूर खंडपीठात याचिका
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा:-मलकापूर
मलकापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती उत्सव मिरवणुकीत शिवभक्त मयुर हुबे व विनोद काळे नाचत असताना बेसावध असताना त्यांच्यावर तलवार, फायटरच्या धारदार शस्त्राने, सपासप वार करण्यात आले. यामध्ये दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळले या दरम्यान त्यांच्या सोबत असलेल्या शिवभक्तांनी त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. यावेळी मयूर, विनोद यांच्या अंगावरील कपडे रक्ताने ओले चिंब भिजलेले असल्याचे दिसून आले. यावेळी शिवभक्तांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी पवन राजपूत, ओम राजपूत, अतुल प्रतापसिंग राजपूत, धनराज मंगलसिंग राजपूत यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.या फौजदारी रिट याचिकेत म्हटले आहे की, १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटनेत पोलिसांनी बी.एन.एस कलम ११८ (२), ११७ (१), ११९ (२), ११५ (२), ३५१ (२), ३५२, (३) (५) नुसार गुन्हे दाखल केले. वादग्रस्त व आर्थिक लाभापोटी काम करण्याचा आरोप असलेले तपास अधिकारी गजानन कवळासे यांनी काही दिवसांतच त्या गुन्ह्याची शहानिशा न करता लगेचच बी.एन.एस कलम, (२) व ११९ (२) कमी करून स्वहित साधले.यामुळे गुन्हेगारी वृत्तीच्या धनराज राजपूत व अतुल राजपूत या दोन आरोपींना सूचना पत्रावर सोडण्यात आले. या गंभीर प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कवळासे यांनी केलेल्या तपास संशयाच्या भोवऱ्यात अडकला. याला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २४ जून रोजी फौजदारी रिट याचिका दाखल झाल्याने या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. कायद्याची पायमल्ली करत वादग्रस्त तपास
शिवभक्तावरील हल्ला प्रकरणात राजकीय दबावात काम करणारे वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कवळासे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

शिवजयंती दिनी, १९ फेब्रुवारी रोजी शिवभक्त मयूर हुंबे यांच्यावर भ्याड हल्ला झाला होता. या प्रकरणातील आरोपींना राजकीय दवाबाखाली व आर्थिक लाभापोटी वाचवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कवळासे व पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी प्रयत्न केले. त्यामुळे एका आरोपीला वाचवले असल्याचा ठपका शिवभक्तांनी ठेवला होता. या विरोधात मयुर हुंबे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. यामध्ये सचिव मार्फत महाराष्ट्र राज्य गृह मंत्रालय, पोलीस महानिरीक्षक अमरावती, पोलीस अधीक्षक बुलडाणा, मलकापूर शहर पोलीस ठाण्याला यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

Previous articleलोकप्रतिनीधी यांच्या गावात नेमकं चाललंय काय “
Next articleविष्णूवाडी चौक झाला हड्डीतोडी चौक !! 10 मिनिटात घसरून पडले 12 जण…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.