Home भंडारा साकोलीत वृक्षांचा द्वितीय वाढदिवस साजरा खोब्रागडे कुटूंबीयांचा आदर्श • जिल्हा परिषद हायस्कूलचे...

साकोलीत वृक्षांचा द्वितीय वाढदिवस साजरा खोब्रागडे कुटूंबीयांचा आदर्श • जिल्हा परिषद हायस्कूलचे सहकार्य

59

आशाताई बच्छाव

1001653762.jpg

साकोलीत वृक्षांचा द्वितीय वाढदिवस साजरा

खोब्रागडे कुटूंबीयांचा आदर्श • जिल्हा परिषद हायस्कूलचे सहकार्य

 

संजीव भांबोरे
भंडारा- साकोली येथील जि. प. सेवानिवृत्त शिक्षिका सिंधू राधेश्याम खोब्रागडे यांनी ३० जून २०२३ ला त्यांच्या वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्तीला जिल्हा परिषद हायस्कूल परीसरात ५८ वृक्षांची लागवड केली. त्या वृक्षांचा आज ( सोम. ३० जून ) ला द्वितीय वाढदिवस येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी जि. प. हायस्कूल प्रशासनाचे अतुल्य सहकार्य लाभले. खोब्रागडे कुटूंबीयांनी हा नवा आदर्श शहरात प्रस्थापित केला आहे. तर दरवर्षी येथे वाढदिवस शेणखताचा केक कापून साजरा केला जातो हे उल्लेखनीय.
सेवानिवृत्त शिक्षिका सिंधू राधेश्याम खोब्रागडे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशी वयाची ५८ वर्ष पूर्ण झाल्यामुळे रोडच्या दोन्ही बाजूंनी रॉयल पॉमची ५८ झाडांची २०२३ ला लागवड केली होती. तसेच संपूर्ण झाडांना ठिबक सिंचनाची व्यवस्था सुद्धा से. नि. शिक्षिका सिंधू खोब्रागडे यांनी केली असून सर्व झाडे आज जिवंत आहेत. त्यानिमित्त आज झाडांचा दुसरा वाढदिवस साजरा करून झाडांना शेणखताचा केक भरवण्यात आला. यावेळी राधेश्याम खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, सर्वांनी आपल्या जन्मदिनी “एक पेड मॉं के नाम” ही मोहीम राबवावी, ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा कसा करता येईल याचे विशेष महत्त्व समजावून सांगितले व आपला निसर्ग कसा हिरवेगार ठेवता येईल असे मार्गदर्शन केले. सिंधू खोब्रागडे यांनी सांगितले की मुलांनी हायस्कूल परीसरात येता जातांनी या वृक्षांना पाणी घालून त्याच्या सुरक्षेसाठी लक्ष केंद्रित करावे. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद हायस्कूल मुख्याध्यापक धर्मेंद्र कोचे, शिक्षक बाळा चव्हाण, किशोर पोगडे यांनीही मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर सपाटे, आशिष चेडगे, डि. जी. रंगारी, सामाजिक कार्यकर्ता सुरेश बोरकर, प्रा. भेंडारकर, लक्ष्मी डबरे, प्रा. डोये तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि परीसरातील नागरिक उपस्थित होते.

Previous articleजालना जिल्ह्यातील युवकाचा निघृण खून ! मृतदेह तढेगाव शिवारात सापडला; वाळूतस्करीच्या वादातून हत्येचा संशय
Next articleराहुरी येथे ₹ 70लाख 73 हजार 920 रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त …
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.