Home बुलढाणा जालना जिल्ह्यातील युवकाचा निघृण खून ! मृतदेह तढेगाव शिवारात सापडला; वाळूतस्करीच्या वादातून...

जालना जिल्ह्यातील युवकाचा निघृण खून ! मृतदेह तढेगाव शिवारात सापडला; वाळूतस्करीच्या वादातून हत्येचा संशय

61

आशाताई बच्छाव

1001653729.jpg

जालना जिल्ह्यातील युवकाचा निघृण खून ! मृतदेह तढेगाव शिवारात सापडला; वाळूतस्करीच्या वादातून हत्येचा संशय
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- देऊळगावराजा तालुक्यातील किनगावराजा तढेगाव शिवारात रस्त्याच्या कडेला आढळून आलेल्या युवकाचा मृतदेह प्रकरण आता गूढतेतून उकलू लागले असून, ही घटना अपघात नव्हे तर थेट खून असल्याचे समोर आले आहे! सुरेश तुकाराम आर्दड (रा. राजा टाकळी, ता. घनसावंगी, जि. जालना) या युवकाचे अज्ञात मारेकऱ्यांनी अपहरण करून निघृणपणे खून केल्याचे उघड झाले आहे.२८ जून रोजीच घनसावंगी पोलिस ठाण्यात सुरेशच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी सकाळी सहा वाजताच्या सुमारास तढेगाव शिवारात एका अज्ञात युवकाचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला ही घटना अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवली गेली होती. मात्र, आज झालेल्या अधिक तपासात मृताची ओळख पटली आणि खळबळजनक सत्य बाहेर आले. मारेकऱ्यांनी सुरेशचे अपहरण करून त्याची निघृण हत्या केली आणि मृतदेह किनगावराजा पोलीस ठाणे हद्दीतील तढेगाव शिवारात टाकून दिला. या हत्याकांडाने दोन्ही जिल्ह्यांत खळबळ उडाली असून, पोलिसांसमोर गुन्हेगारांचा माग काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
किनगावराजा पोलीस ठाण्याचे एपीआय विनोद नरवाडे, पोहेकॉ. विष्णू मुंढे व पोशि. सुभाष गीते तपासात गुंतले असून, आरोपींचा छडा लावण्यासाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आले आहे. आता मारेकरी गजाआड जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे !

Previous articleतळ्यात मळ्यात! पक्ष बदलाचे वारे ! – उबाठाच्या महिला पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात !
Next articleसाकोलीत वृक्षांचा द्वितीय वाढदिवस साजरा खोब्रागडे कुटूंबीयांचा आदर्श • जिल्हा परिषद हायस्कूलचे सहकार्य
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.