Home बुलढाणा तळ्यात मळ्यात! पक्ष बदलाचे वारे ! – उबाठाच्या महिला पदाधिकारी शिवसेना शिंदे...

तळ्यात मळ्यात! पक्ष बदलाचे वारे ! – उबाठाच्या महिला पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात !

59

आशाताई बच्छाव

1001653685.jpg

तळ्यात मळ्यात! पक्ष बदलाचे वारे ! – उबाठाच्या महिला पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:-बुलडाणा स्थानिक स्वराज्य
संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पक्ष बदलाचे वारे बुलढाण्यात वाहत आहेत. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख पद्माताई नितीन परदेशी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनामध्ये पक्षप्रवेश झाला आहे.29 जून रोजी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या जयस्तंभ चौकातील मातोश्री जनसंपर्क कार्यालयात हा छोटेखानी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख पद्माताई नितीन परदेशी यांच्यासह चंद्रभागा भारत इंगळे, माया संतोष खराडे, यांच्यासह असंख्य महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleपोलिसांचा धाक संपला ? – चोरट्यांचा ‘किराण्या’वर डल्ला !
Next articleजालना जिल्ह्यातील युवकाचा निघृण खून ! मृतदेह तढेगाव शिवारात सापडला; वाळूतस्करीच्या वादातून हत्येचा संशय
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.