आशाताई बच्छाव
पोलिसांचा धाक संपला ? – चोरट्यांचा ‘किराण्या’वर डल्ला !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
देऊळगाव राजा :– बुलडाणा मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाचे टीन पत्राचे शेडचे कुलूप तोडून, 12000 रुपयांचा किराणा तर नगदी 5500 रुपये लंपास केले आहे. इतर लोकांच्या घरी सुद्धा चोरी झाल्याची फिर्याद देण्यात आली आहे. अलीकडे चोऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून पोलिसांचा धाक संपला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. फिर्यादी सौ. मंदा सौदाजी खेत्रे यांचे देऊळगाव मही येथे वार्ड क्रमांक चार मध्ये किराणा दुकान आहे. 28 जून रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडले व 12000 रुपयांचा किराणा माल आणि नगदी 5500 रुपये घेऊन पोबारा केला आहे. या संदर्भात 30 जून रोजी तक्रार दाखल झाली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीन देशमुख करीत आहेत.