आशाताई बच्छाव
एस एन मोर महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा_गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरीदेवी सराफ विज्ञान महाविद्यालयात नुकताच रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा आणि सेठ नरसिंगदास मोर महाविद्यालय तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.आर. के. दिपटे हे होते. प्रास्ताविक डॉ. सुधाकर झळके (सहाय्यक आयुक्त, जिल्हा उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा) यांनी केले. या कार्यक्रमाला श्री पंकज बुधे (प्राचार्य, मायनिंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर), श्री पांडव, (रोजगार अधिकारी), श्री सी. एस. राऊत, (शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर), प्रा देवेंद्र सोनटक्के (आठवले समाजकार्य महाविद्यालय, भंडारा) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. ए. जाधव यांनी रोजगार मेळाव्यातील स्टॉलला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या रोजगार मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित कंपनी, प्लेसमेंट एजन्सींनी व उद्योग अर्थसहाय्य पुरविणाऱ्या शासकीय महामंडळानी सहभाग घेतला. तसेच उमेदवारांनी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने नोंदणी केली.
मेळाव्याच्या शेवटी निवड झालेल्या उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सचिन वेरुळकर (समन्वयक, रोजगार मार्गदर्शन कक्ष) यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विविध विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी व उमेदवार उपस्थित होते.