आशाताई बच्छाव
नागपूर येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन कार्यक्रम संपन्न
संजीव भांबोरे
नागपूर _अर्पण बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारा संचलित रिलिप व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र नवीन गाडगे बाबा नगर नागपूर केंद्रा तर्फे दि. 26 जून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले नंदनवन पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक आकाश भैराट यांनी व्यसन व व्यसनातून होणारे गुन्हे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भगवती महाविद्यालय येथील प्राचार्य सौ.दीपा हटवार यांनी व्यसनातून परिवार नाते संबंध समाज यातून व्यसनी कसा दूर होऊन दुभागला जातो यावर मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे बार्टी समतादूत, प्रबोधनकार सतीश सोमकुवर यांनी व्यसनामुळे व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक, सामाजिक व आर्थिकतेवर होणारे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी अर्पण बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव सौ. नंदा आदमने यांनी सुद्धा व्यसनावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे ए. ए. सदस्य रवींद्र निमकर व नंदनवन पोलिस स्टेशन येथील अनिकेत वैध, धीरज थोटे , लंकेश उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन समुपदेशक महेंद्र वैरागडे यांनी मानले. व कार्यक्रम यशस्वी करण्याकरता धीरज , आशिष , निलेश, निखिल या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.